Tue, Jul 16, 2019 13:46होमपेज › Konkan › सिंधुकन्या बाहेर काढण्याचा प्रयत्न अयशस्वी

सिंधुकन्या बाहेर काढण्याचा प्रयत्न अयशस्वी

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 05 2018 11:15PMमालवण : प्रतिनिधी 

पर्यटन महामंडळाची सुमारे दीड कोटी रुपये खर्चाची ‘सिंधुकन्या’ हाऊसबोट  तारकर्ली खाडीपात्रात  गटंगळ्या खात अखेरच्या घटका मोजत आहे. बोटीला पडलेल्या छिद्रांची एमटीडीसी प्रशासनाकडून वेळेत दुरुस्ती न झाल्याने बोटीला जलसमाधी मिळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

दरम्यान, बोटीतील पाणी उपसा करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू असले तरी त्याला कोणतेही यश  प्राप्त झाले नाही. त्यामुळे एमटीडीसीच्या वरिष्ठ अधिकारी टीमला पाचारण करण्यात  आले असून त्यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती तारकर्ली एमटीडीसी व्यवस्थापक एस. ए. कांबळे यांनी दिली आहे. 
तर बोट पाण्याबाहेर काढण्यासाठी बंदर विभागाचीही मदत घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.