Sun, Jul 21, 2019 12:01होमपेज › Konkan › मालवण- पुणे शिवशाही बस फेरीचा शुभारंभ

मालवण- पुणे शिवशाही बस फेरीचा शुभारंभ

Published On: Nov 30 2017 11:31PM | Last Updated: Nov 30 2017 10:04PM

बुकमार्क करा

मालवण : वार्ताहर 

राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही या आलिशान मालवण-पुणे - निगडी या बसफेरी चा शुभारंभ  मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते  व आ. वैभव नाईक उपस्थित करण्यता आला.   

 आगार व्यवस्थापक संतोष बोगरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.  शुभारंभ प्रसंगी सिंधुदुर्गचे विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांच्याबरोबर मालवणातील व्यापारी आणि नागरिकांनी चर्चा केली. चर्चे दरम्यान, एसटी विषयीच्या अनेक मागण्यांकडे उपस्थितांनी लक्ष वेधले. आ.  वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत व्यापारी संघाचे  नितीन वाळके यांनी  मालवण-पुणे-निगडी या शिवशाही बसफेरीचा सायंकाळी 4 वा. सुटण्याची वेळ गैरसोयीची आहे. ही बस रात्री सोडण्यात यावी अशी मागणी केली. तर शिवशाही बसफेरीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलत नसल्याने मालवण-पुणे ही सायंकाळच्या वेळी सुटणारी नियमित गाडी बंद करू नये अशी मागणी विजय केनवडेकर यांनी केली.

सायंकाळनंतर आचरा, कसाल, कुडाळ मार्गावर ये-जा करणार्‍या गाड्यांची कमतरता असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून या तीन मार्गावर शटल सेवा सुरू करण्याची मागणी मालवण व्यापारी संघाने केली. या तिन्ही मार्गांवर ही सेवा सुरू करण्याच्या सुचना आ. वैभव नाईक यांनी  विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांना केली. श्री हसबनीस यांनी या तिन्ही मार्गावर लवकरात लवकर शटल सेवा सुरू करण्याची ग्वाही दिली. 

 पत्रकार नंदकिशोर महाजन यांनी रात्रौच्या वेळी मालवणात येणार्‍या कोल्हापुर-मालवण, रत्नागिरी-मालवण या गाड्या मालवण बाजारपेठेत नेण्याची मागणी केली. यावर तसे आदेश श्री हसबनीस यांनी आगार व्यवस्थापकांना दिले. पहिल्याच दिवशीच्या शिवशाही बसचे  आठ प्रवाशांनी आरक्षण केले होते.