Mon, Jun 24, 2019 16:55होमपेज › Konkan › बिअरबार दारू दुकाने परवान्यांसाठी नियमात शिथिलता

बिअरबार दारू दुकाने परवान्यांसाठी नियमात शिथिलता

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मालवण : वार्ताहर

ग्रामीण भागात राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बार, दारूच्या दुकानांना दारू विक्री करण्यास मनाई करण्याच्या आदेशात महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाने काही प्रमाणात शिथीलता आणली आहे. राज्य सरकारने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दारु विक्री करणार्‍या दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यास परवानगी दिली आहे. डिसेंबर 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगत 500 मीटर अंतरावर असलेल्या सगळ्या प्रकारच्या दारू विक्रीवर बंदी घातली होती. याबाबत अनेक दारू विक्री संघटनाही न्यायालयात गेल्या होत्या.

आता गटविभागाचे सहसचिव  यांनी 31 मार्च  रोजी  आदेश काढला असून यात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून दारूविक्रीच्या दुकानांसाठी जे अंतर ठरवून दिलेलं आहे त्या अंतरातील दारु विक्री करणार्‍या दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचे निश्‍चित झाले आहे. सरकारने काढलेल्या आदेशांमध्ये खालील मुद्दे नमूद करत परवाना नूतनीकरणास परवानगी दिली आहे. शासनाचा नवा आदेश किमान 5 हजार लोकसंख्या असणार्‍या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील दारु दुकानांनाच्या परवान्यांचे नूतनीकरण होणार.

ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये एम.आय.डी.सी.ने विकसित केलेले औद्योगिक क्षेत्र असल्यास त्यांनाही परवाने पुन्हा मिळणार. तीर्थस्थळ वगळता ज्या ग्रामपंचायतींमध्ये युनेस्को किंवा राज्य, केंद्र सरकारने पर्यटन स्थळ घोषित केले आहे अशा ग्रामपंचायतींमध्येही दारूच्या परवान्यांचे नूतनीकरण होईल. ज्या ग्रामपंचायतींचा विकास आराखडा शासनाने मंजूर केला असून तिथेही परवान्यांचे नूतनीकरण होईल, असे शासन आदेशात म्हटले आहे.
 


  •