Wed, Jan 16, 2019 21:48होमपेज › Konkan › मैथिली सावंत करणार देशाचे प्रतिनिधीत्व

मैथिली सावंत करणार देशाचे प्रतिनिधीत्व

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 8:59PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैथिली सुनील सावंत (द्वितीय वर्ष विज्ञान) हिची दिल्ली येथे होणार्‍या प्रजासत्ताक दिन संचलनाकरिता निवड झाली आहे. एन.सी.सी. नेव्हल विभागाची लीडिंग कॅडेट असलेली मैथिली मानाच्या अशा आंतरराष्ट्रीय ‘युथ एक्सचेंज प्रोग्राम-2018’ करिता देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. 

प्रत्येक  एन.सी.सी. कॅडेटचे हे एक मोठे स्वप्न असते. शिप मॉडेलिंगकरिता तिने विशेष प्रयत्न केले आहेत. आंतरराष्ट्रीय शिबिराकरिता निवड होण्यासाठी खूप खडतर असे प्रयत्न करावे लागतात. 

यामध्ये  मुलाखत, लेखी परीक्षा,  इव्हेंट सादरीकरण, परेड, व्यक्‍तिमत्त्व, सामान्यज्ञान अशा विविध प्रक्रियांमधून निवड व्हावी लागते. भारताबाहेर होणार्‍या या आंतरराष्ट्रीय शिबिराकरिता भारतातून केवळ 100 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. 

या कामगिरीबद्दल मैथिली हिचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कमांडिंग ऑफिसर निळकंठ खौंड, एन.सी.सी. ऑफिसर कॅप्टन सीमा कदम, एस.एम.आय. शशिकांत जाधव आणि एन.सी.सी. ऑफिसर्स यांनी अभिनंदन केले आहे.