Tue, May 21, 2019 18:13होमपेज › Konkan › महावितरणची थकबाकी ८ कोटींवर

महावितरणची थकबाकी ८ कोटींवर

Published On: Dec 10 2017 1:20AM | Last Updated: Dec 09 2017 8:19PM

बुकमार्क करा

कुडाळ : वार्ताहर

महावितरणची जिल्ह्यातील थकबाकी आता सुमारे 8 कोटींवर पोहोचली आहे. महावितरणने थकबाकी वसुलीसाठी जाहीर केलेल्या संजीवनी योजनेसाठी जिल्ह्यातील केवळ 3 हजार 361 थकबाकीदर पात्र असून, या ग्राहकांकडे 8 लाख रूपये येणे बाकी आहे.  जिल्हयातील 375 थकबाकी दारांनी या योजनेचा लाभ घेत महावितरणला सहकार्य केले. महावितरणचा वाढता खर्च व वाढता थकबाकीचा भार कमी करण्यासाठी जिल्हयातील थकीत ग्राहकांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांनी केले आहे.

जिल्हयातील वाढती थकबाकी व महावितरणच्या योजना याविषयी माहिती देण्यासाठी चंद्रशेखर पाटील यांनी  दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. जिल्हयात 11 हजार, घरगुती ग्राहकांकडे 2 कोटी, 7 हजार 200 व्यापारी ग्राहकांकडेे 56 लाख तर उद्योगामधील 200 ग्राहकांकडे 56 लाख  तर लघुउद्योगामधील 200 ग्राहकांकडे 8 लाख थकबाकी शिल्‍लक राहिली आहे. ही थकबाकी चार महिन्यांपूर्वी पासूनची आहे.

तर आता पर्यंतच्या थकबाकीचा आकडा 8 कोटीवर पोहोचला आहे. तर महावितरणच्या कृषी संजीवनी योजनेसाठी जिल्ह्यात 3 हजार 361 योजनेस पात्र ठरले आहेत. या योजनेत पात्र होण्यासाठी 30 हजार पेक्षा कमी थकबाकी असलेल्यांना 3 हजार तर 30 हजारपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांना ग्राहकांना 5 हजार रू. भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे.   महावितरणचे कुडाळ विभागीय कार्यकारी अभियंता के.पी. लवेकर उपस्थित होते.