Sun, Aug 25, 2019 12:48होमपेज › Konkan › सेनेलाच मराठा आरक्षण नको : राणे 

सेनेलाच मराठा आरक्षण नको : राणे 

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 02 2018 10:37PMरत्नागिरी : प्रतिनिधी

आघाडी सरकारने स्थापन केलेल्या मराठा आरक्षण समितीने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण तर मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण दिले होते. पण राज्यात सत्तेवर येताच शिवसेनेने 5 टक्के आरक्षण बंद केले तर 16 टक्के आरक्षण रद्द केले.आरक्षण मिळावे, या मताची शिवसेना नाही, असा गौप्यस्फोट महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी केले. येथील हॉटेल विवेकच्या मैदानावर आयोजित महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी तोडफोड, जाळपोळ सुरू आहे. 

तरुण आत्महत्या करताहेत. हे समजताच मुख्यमंत्र्यांना भेटलो. कलम 307 अन्वये केस दाखल झाली तर त्या व्यक्‍तीचे कुटुंब उद्ध्वस्त होईल. यामुळे महाराष्ट्राचे नाव खराब होत आहे. हे थांबले पाहिजे, असे त्यांना सांगितले. यावर मागासवर्गीय आयोगाने अहवाल दिला तर एक महिन्याच्या आत आरक्षण देईन, असे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. 

महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे मी ट्रेनने प्रवास करून येथे आलो आहे. चिपळूण ते कणकवली या मार्गावर खड्डेच खड्डे आहेत. काय करतात येथील आमदार, खासदार? का नाही बोलत सभागृहात? रत्नागिरीचे काही मंत्री मंत्रिमंडळात आहेत; मात्र, मुख्यमंत्री त्यांना भेट देत नाहीत. राणे मुख्यमंत्र्यांना भेटले म्हणून ‘मातोश्री’वर शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक झाली. यावरुनच शिवसेनेच्या मंत्र्यांची ताकद दिसते, असेही राणे म्हणाले.