Sun, May 26, 2019 19:43होमपेज › Konkan › महाड : 'चवदार तळे' सत्याग्रह कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज (व्‍हिडिओ)

महाड : 'चवदार तळे' सत्याग्रह कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज (व्‍हिडिओ)

Published On: Mar 19 2018 4:25PM | Last Updated: Mar 19 2018 4:30PMमहाड : प्रतिनिधी 

महाड नगरीमध्ये २० मार्च २०१८ रोजी होणार्‍या चवदार तळे सत्याग्रहाच्या कार्यक्रमाकरिता प्रशासन सज्ज झाले आहे. या कार्यक्रमासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पिण्याच्या पाण्याकरिता उभारलेल्या लढ्याची आठवण म्हणून चवदार तळे सत्याग्रहादिवसी लाखोंच्या संख्येने भीमसैनिक महाडनगरीत दाखल होतात. १९ मार्च २०१८ते २० मार्च २०१८ हे दोन दिवस  महाडनगरीमध्ये  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भीमा तुझ्या जन्मामुळे हा प्रा. प्रकाशकुमार वानखेडे यांचा कार्यक्रम १९ मार्च २०१८ रोजी रात्री ९ ते १२ तर २० मार्च २०१८ रोजी शार्दुल सोनवले यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम शार्दुल सोनवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, अभिवादन चवदार तळे क्रांती स्तंभ, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी दीपप्रज्वलन व पुष्पांजली कार्यक्रम होणार आहे. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्‍थित राहणार आहेत. आंबेडकरी शायरी जलसे, अनिरुद्ध बनकर स्टडीज ऑफ लिबर्टी, राहुल  भांडारे यांचे कार्यक्रम होणार आहेत.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड चवदारतळे सत्याग्रहाच्या ९१ व्‍या वर्धापन दिनानिमित्त विविध आंबेडकर सघटनांकडून महाड शहरात कमानींची उभारणी केली आहे.