होमपेज › Konkan › गणपतीपुळे देवस्थानात माघी उत्सव

गणपतीपुळे देवस्थानात माघी उत्सव

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 10 2018 10:56PM

बुकमार्क करा
 

रत्नागिरी  ः प्रतिनिधी

संस्थान श्रीदेव गणपतीपुळेतर्फे श्रींच्या मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि. 18 ते 24 जानेवारी या सात दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रम होणार आहेत. गुरुवार दि. 18 रोजी सकाळी 9.30 ते 11.30 या कालावधीत श्रींची महापूजा व प्रसाद, सायंकाळी 4 ते 7 गणेशयाग, शुक्रवार दि. 19 रोजी सकाळी 7 ते 12 या वेळेत वर्धापनदिनानिमित्त कलशारोहण आणि गणेशयाग पूर्णाहुती, शनिवारी दि. 20 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत सहस्त्र मोदक समर्पण, रविवार दि. 21 रोजी माघी यात्रा, सायंकाळी 4 वाजता श्रींची पालखी मिरवणूक (प्रदक्षिणा), मंगळवार दि. 23 रोजी रात्री 10 वाजता नाटक - साखर खाल्‍लेला माणूस, बुधवार दि. 24 रोजी दुपारी 11.30 ते 2 या वेळेत महाप्रसाद पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांचा भाव भक्‍ती गीतांचा मंगलदीप कार्यक्रम होणार  आहे.

याचबरोबर राष्ट्रीय कीर्तनरत्न प्राचार्य डॉ. दिलीप डबीर, नागपूर यांचे दि. 18 ते 22 या कालावधीत दररोज सायंकाळी 7.30 वा. कीर्तन होणार आहे. यामध्ये दि. 18 रोजी पंढरी महात्म्य, दि. 19 रोजी कानडावो विठ्ठलु, दि. 20 रोजी पन्हाळगडाचा वेढा (सिद्धी जौहर मोहीम), दि. 21 रोजी पावनखिंड (बाजीप्रभू देशपांडे), दि. 22 रोजी मातृभेट या विषयांवर कीर्तन करणार आहेत. या कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यमान पंचकमिटीचे सरपंच डॉ. विवेक भिडे यांनी केले आहे.