Thu, Nov 15, 2018 11:35होमपेज › Konkan › कुडाळात महावितरणची लक्षवेधी सुरक्षा रॅली

कुडाळात महावितरणची लक्षवेधी सुरक्षा रॅली

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 11 2018 10:43PM

बुकमार्क करा
 

कुडाळ : वार्ताहर

उद्योग, उर्जा व कामागार विभाग, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी सिंधुदुर्ग इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्या संयुक्‍त  विद्यमाने विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या जागृतीसाठी कुडाळ शहरात सुरक्षा रॅली काढण्यात आली.
महावितरणचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते विभागीय कार्यालय हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरूवात  करण्यात आली. यावेळी महावितरणचे कुडाळ विभाग कार्यकारी अभियंता के. पी. लवेकर उपस्थित होते. ही रॅली कुडाळ  हायस्कुल, पोस्ट ऑफिस, बस स्थानक, गांधी चौक, मुख्य बाजारपेठ, पानबाजार व हॉटेल  गुलमोहोर येथे त्याची समाप्ती करण्यात आली.

या रॅलीत विद्युत  सुरक्षेबाबतच्या विविध उपाययोजना, नियम, धोरणे यासारख्या अनेक विविध मुद्यांबाबत  पोस्टर्स, पथनाट्ये, ध्वनीक्षेपक याद्वारे जनजागृती करण्यात आली.  रॅली दरम्यान विद्युत सुरक्षा पुस्तिकांचे  व विद्युत सुरक्षेसाठी काय करता येईल या माहिती पत्रकांचे  मोफत वितरण करण्यात आले.  महावितरणचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील व कार्यकारी अभियंता के.पी. लवेकर सुरक्षादुत, विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उस्फुर्तपणे व मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

राबविण्यात येणार्‍या विद्युत  सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ व विद्युत सुरक्षा संदेश रथाचा शुभारंभ गुरूवारी ओरोस येथे करण्यात आला. सप्ताहाअंतर्गत आठवड्याभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याचअंतर्गत कुडाळ शहरात गुरूवारी  ही सुरक्षा रॅली काढण्यात आली. महावितरणच्या वतीने तयार करण्यात आलेला हा सुरक्षा रथ जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात फिरून जनमानसात विद्युत सुरक्षेविषयी  जनजागृती करणार आहे. सुरक्षारथ 12 जानेवारी रोजी पिंगुळी, झाराप, माणगांव, सावंतवाडी शहर व तालुका 13 जानेवारी रोजी दोडामार्ग, भेडशी, बांदा, मळगांव, आरोंदा शिरोडा, 14 जानेवारी वेंगुर्ला शहर व  तालुका, 15 रोजी मालवण शहर व तालुका, 16 रोजी देवगड, जांमसंडे, पडेल तळेबाजार, शिरगांव, नांदगाव व 17 जानेवारी रोजी कणकवली शहर, फोंडा व वैभववाडी येथे या जनजागृती रथयात्रेची सांगता  करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे.