Mon, Jun 24, 2019 21:24होमपेज › Konkan › शेतकर्‍यांना महावितरणकडून सवलत!

शेतकर्‍यांना महावितरणकडून सवलत!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कुडाळ : वार्ताहर

मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजनेत सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा देत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 30 हजाराची थकबाकी असल्यास सुरुवातीला 3 हजार व 30 हजारापेक्षा अधिक थकबाकी असल्यास 5 हजार रुपये भरण्याची सवलत शुक्रवारी जाहीर केली आहे.  ही रक्‍कम 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत भरावयाची आहे. ज्या शेतकर्‍यांना वीजदेयकाची दुरुस्ती करावयाची आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक फिडरनिहाय वीजदेयक दुरुस्ती शिबिराचे आयोजन 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2017 या कालावधीत महावितरणतर्फे करण्यात येणार आहे.

मुंबई येथे महावितरणच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.बैठकीला ऊर्जा सचिव अरविंद सिंह, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार व महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे  उपस्थित होते. ज्या शेतकर्‍यांचा वीजपुरवठा वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे खंडित करण्यात आला आहे,अशा शेतकर्‍यांनी पैसे भरताच त्यांचा वीजपुरवठा तात्काळ जोडण्यात येणार आहे.मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणार्‍या ज्या शेतकर्‍यांची  देयके वाढून आली आहेत त्यांनी फिडरनिहाय आयोजित शिबिरात सहभाग घेऊन देयके तपासून घ्यावीत,असे आवाहन महावितरणने केले आहे.   मात्र, आता या योजनेची मुदत 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे.