Thu, Jul 18, 2019 16:59होमपेज › Konkan › नाणार प्रकल्प रेटल्यास ‘खळ्ळखट्याक्’!

नाणार प्रकल्प रेटल्यास ‘खळ्ळखट्याक्’!

Published On: Apr 21 2018 1:00AM | Last Updated: Apr 20 2018 11:07PMसावंतवाडी : प्रतिनिधी

मनसेचा ‘मोदी विरोधी आणि मोदी हटाव’चा प्रचार सुरू झाला असून  त्याबरोबरच नाणार प्रकल्पालाही मनसेचा तीव्र विरोध आहे. शासनाने जनविरोध डावलून नाणार प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न केल्यास मनसे ‘खळ्ळ्खट्याक’ करेल असा इशारा मनसेचेे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिला.

सिंधुदुर्ग दौर्‍यावर असलेले माजी आ. नितीन सरदेसाई, मनसे नेते शिरीष सावंत, स्नेहल जाधव, सत्यवान दळवी, गणेश महाले यांचे पथक  जिल्हाध्यक्ष धीरज परब, राजन दाभोलकर, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, चैताली भेंडे आदींंसह  सावंतवाडी येथे दाखल झाले. 

या वेळी मनोज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोकणातील मनसेची  जबाबदारी माजी आ.परशुराम उपरकर यांच्याकडे देण्यात आली असून ते संघटना बांधणीसाठी 1 मे पासून प्रारंभ करतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाच टीम तयार केल्या असून यापुढे मनसे प्रस्थापितांना धक्‍का देईल व त्याची सुरुवात कोकणात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

पक्ष बांधणीबरोबरच शहराचा ग्रामीण भागाशी संपर्क व्हावा, कामाची आखणी तसेच पक्ष बळकटीसाठी  काही तालुकास्तरावर राज ठाकरे यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.  तालुका संपर्क प्रमुखांच्या नेमणुका जाहीर केल्या असून लवकरच जि. प.  मतदारसंघ निहाय संपर्कप्रमुख नियुक्‍त केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

Tags : MNS protests against nanar project Sawantwadi news