Fri, Apr 26, 2019 15:28होमपेज › Konkan › मनसे, स्वाभिमानबाबत सर्वाधिक उत्सुकता 

मनसे, स्वाभिमानबाबत सर्वाधिक उत्सुकता 

Published On: Apr 06 2018 11:38PM | Last Updated: Apr 06 2018 11:13PMदेवरुख : वार्ताहर

‘स्वाभिमान’ खाते उघडणार काय याचीच सर्वाधिक उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. गत पहिल्या निवडणुकीत शिवसेना 7, भाजप 5, राष्ट्रवादी 4, काँग्रेस 1 असे पक्षीय बलाबल होते. मात्र, काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आलेला असतानाही उपनगराध्यक्ष होण्याचा मान काँग्रेसच्या अभिजित शेट्ये यांनी मिळविला होता. यावेळेस अशी किमया कोणता पक्ष करतो का याकडे नजरा वळल्या आहेत. यावेळेस अपक्ष उमेदवारांची संख्याही लक्षणीय आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही या निवडणूक रिंगणात उतरला आहे.  

‘मनसे’ने प्रभाग 10 मधून गिरीश भोंदे, प्रभाग 11 मधून सानवी संसारे, प्रभाग 12 मधून आस्ता कोचिरकर, प्रभाग 15 मधून पूजा मांगले या चार उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तर स्वाभिमान पक्षाने प्रभाग 16 मधून सुरेंद्र पांचळ, प्रभाग 15 मधून प्रणाली विंचू, प्रभाग 10 मधून अमोल सुर्वे, प्रभाग 7 मधून तेजश्री मुळ्ये, प्रभाग 6 मधून संगीता हातीस्कर, प्रभाग 3 मधून श्रद्धा भोसले आणि नगराध्यक्षपदासाठी माजी नगरसेविका मिताली तळेकर यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहे.  भाजप आणि ‘मनसे’ यांची आगळी-वेगळी युती देवरुख नगरपंचायत निवडणुकीत पहावयास मिळत आहे. त्यांना ‘आरपीआय’नेही साथ दिली आहे. तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. 

देवरुख नगरपंचायत निवडणुकीसाठी ‘मनसे’ आणि स्वाभिमान पक्ष यांनी एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरवले असून त्यांच्या प्रचारासाठी अद्याप कोणतीही मोठी सभा घेतलेली नाही. सभा घेण्यापेक्षा घराघरांपर्यंत पोहचणे अत्यावश्यक असल्याचे उमेदवारांना आता वाटू लागले आहे.  मात्र, सभेने वातावरण निर्मिती होते. अशी म्हणणारी मंडळीही काही कमी नाहीत. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रथम ‘मनसे’ सभा घेते, की स्वाभिमान पक्ष सभा घेतो हे काही दिवसांतच समोर येणार आहे. ‘मनसे’ आणि ‘स्वाभिमान’ यांना देवरुखची जनता कितपत साथ देते याचे उत्तर येत्या 12 एप्रिलला मिळणार आहे. 

Tags : MNS, Swabhiman, Party Fight,  Devrukh, Ratnagiri