Wed, Jan 23, 2019 13:35होमपेज › Konkan › कौशल्याधारित अभ्यासक्रमाचे तीन तेरा

शिक्षक संघटना एकत्र आल्यास विरोधाची शक्यता

Published On: Jul 09 2018 1:03AM | Last Updated: Jul 08 2018 8:50PMआसगे : प्रकाश हर्चेकर

एमसीव्हीसी अभ्यासक्रमाला आणखी प्रोत्साहन देण्याऐवजी त्याचे आयटीआयमध्ये रूपांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमसीव्हीसीला शिकवणार्‍या कर्मचार्‍यांच्या सेवानिवृत्ती व स्वेच्छानिवृत्तीमुळे संघटनेची ताकद कमी होत आहे. त्यातच कर्मचार्‍यांच्या वेगवेगळ्या संघटना वाढत असल्याने विरोधाची ताकद विभागली गेली आहे.  मात्र या संघटना एकत्र आल्यास विरोध वाढण्याची चिन्हे आहेत.

राज्यात अकरावी व बारावीच्या कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर राबवण्यात येत असलेल्या किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांचे (एमसीव्हीसी) आयटीआयमध्ये रूपांतर करण्याचा तत्त्वत: निर्णय कौशल्य विकास विभागाने घेतला आहे. हा निर्णय केंद्र सरकारच्या कौशल्य विकासाच्या धोरणाशी सुसंगत नसल्याची ओरड आता होऊ लागली आहे. एमसीव्हीसी अभ्यासक्रमांमध्ये तंत्र, वाणिज्य, पॅरा मेडिकल, मत्स्य, कृषी, होम सायन्सेस, व्यवस्थापन इ. गट आहेत. आयटीआयमध्ये मात्र केवळ तंत्रशिक्षण हा गट होता.
एमसीव्हीसी हा अभ्यासक्रम अकरावी व बारावी या स्तरावर शिकवला जातो. बारावी व्यवसाय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना बी.ए., बी.कॉम. बीएस्सी साठी प्रवेश मिळतो. मात्र केंद्र सरकारच्या नवीन धोरणांनुसार आता शालेय, कनिष्ठ महाविद्यालयीन व पदवी स्तरावर कौशल्य शिक्षणाचे अभ्यासक्रम तयार होऊ लागले आहेत. 

नुकताच राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमांना इ. 10 वी व इ. 12 वी म्हणजेच एस.एस.सी. व एच.एस.सी. परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी परवानगी देऊन अधिक दोन स्तरावरील  एमसीव्हीसी अभ्यासक्रमातील हवा काढून घेतली आहे. असे असले तरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना चांगले दिवस  येणार आहेत हे निश्‍चित !

कौशल्य विकासाचा प्रश्‍न व्यवसाय अभ्यासक्रम बंद करून निर्माण होत आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विस्तार आराखडा तयार करून सोडवण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न युवक - युवतींच्या स्वयंरोजगार निर्मितीसाठी व औद्योगिक क्षेत्राला लागणारे कौशल्ययुक्त मनुषबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने योग्य ठरणार आहे.  शासन स्तरावर अभ्यासक्रमांच्या यशस्वीतेची प्रसिद्धी मिळाल्यास, अधिक ट्रेड उपलब्ध झाल्यास विद्यार्थी आयटीआयकडे आकर्षित होतील, असे  मत प्रा. प्रसाद कुलकर्णी यांनी दै. पुढारीशी बोलताना व्यक्त केले.