Thu, Apr 25, 2019 08:04होमपेज › Konkan › निवृत्त अधिकार्‍याला लुटणार्‍या संशयिताला अटक

निवृत्त अधिकार्‍याला लुटणार्‍या संशयिताला अटक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सावंतवाडी : शहर वार्ताहर

निवृत्त बँक अधिकारी सदानंद निकम यांना भटवाडी येथे भररस्त्यात लुटल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील हैदर सरताजअली इराणी याला शनिवारी आंबोली परिसरात अटक केली. इराणी याने चोरीची कबुली दिली आहे. 

14 नोव्हेंबरला भटवाडी परिसरात शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करून दोन इसमांनी निवृत्त बँक अधिकारी सदानंद निकम यांच्याकडील दोन अंगठ्या व सोन्याची चेन लंपास केली होती. चोरीचा हा सर्व प्रकार भटवाडी येतील गुप्ता नामक व्यावसायिकाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. या चोरीचा तपास करण्यासाठी पोलिस प्रमुख दीक्षितकुमार गेडाम यांनी दोन पथके नेमली होती. त्यानुसार  एलसीच्या पथकाने शनिवारी सकाळी कोल्हापूर-जयसिंगपूर रेल्वे स्टेशन परिसरातील त्याच्या घरी जाऊन चौकशी केली. इराणी हा आंबोलीत असल्याची माहिती प्राप्त झाल्यावर त्याला आंबोली येथून ताब्यात घेण्यात आले.

मोहीम यशस्वी करण्यासाठी पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक शाहू देसाई यांच्यासमवेत सुभाष खंदारे, अनिल धुरी, मनोज राऊत, ज्ञानेश्‍वर कांदळगावकर, अनुप खंडे, सुधीर सावंत, संतोष सावंत आदींनी सहभाग घेतला.