Sun, Jul 12, 2020 20:33होमपेज › Konkan › रेल्वे प्रवासात महिलेचे सव्वा लाखांचे दागिने लुटले

रेल्वे प्रवासात महिलेचे सव्वा लाखांचे दागिने लुटले

Published On: Jun 22 2019 1:04AM | Last Updated: Jun 22 2019 1:04AM
रत्नागिरी : प्रतिनिधी

रेल्वे प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा उठवत महिलेच्या पर्समधील सोन्याचे सुमारे 1 लाख 18 हजार 540 रुपयांचे दागिने लांबवल्याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, कोकण रेल्वेच्या गाड्यांमध्ये चोरीच्या या वाढत्या घटना रेल्वेसह पोलिसांसाठीदेखील आव्हान ठरले आहे.

ही घटना दि. 20 मे रोजी मांडवी एक्स्प्रेसच्या महिला कुडाळ ते रत्नागिरी रेल्वे स्टेशनदरम्यान जनरल डब्यात घडली होती. याबाबत भाग्यश्री भरत सातार्डेकर (वय 51, रा. उल्हासनगर, जि. ठाणे) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, 20 मे रोजी भाग्यश्री सातार्डेकर मांडवी एक्स्प्रेसच्या महिला जनरल डब्यातून प्रवास करत होत्या. कुडाळ ते रत्नागिरी रेल्वे स्टेशनदरम्यान अज्ञात महिलेने त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने लांबवले होते. याबाबत अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.