Tue, Jul 23, 2019 01:59होमपेज › Konkan › ‘नाणार’ विरोधात आज लाँग मार्च

‘नाणार’ विरोधात आज लाँग मार्च

Published On: Aug 31 2018 1:39AM | Last Updated: Aug 30 2018 11:09PMराजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पविरोधात 31 ऑगस्ट रोजी शिवसेना, रिफायनरीविरोधी शेतकरी  तसेच मच्छीमार संघटना यांच्यामार्फत  रत्नागिरी येथे दि. 31 ऑगस्ट रोजी लाँग मार्च काढला जाणार आहे.

कोकणात नाणार पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पासारखा संहारक व प्रदूषणकारी प्रकल्प केंद्र व राज्य शासनाने कोकणावर लादला  असल्याचा आक्षेप शिवसेनेने घेतला आहे. यामुळे आंबा, काजू बागायतदार व मच्छीमार हे मोठ्या संकटात आले असून, या प्रकल्पाला शिवसेना प्रारंभापासून विरोध करीत आहे. या प्रकल्पाविरोधात आंदोलन अधिक तीव्र केले जाणार असून, त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च काढण्यात येणार आहे.

31 ऑगस्टला सकाळी 10 वाजता हा लाँग मार्च निघणार आहे.लाँग मार्च हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन रत्नागिरी कुवारबांव येथून तोंडाला काळ्या पट्ट्या लावून निघणार असून त्यानंतर 200 शालेय विद्यार्थी हे मारुती मंदिर येथे लाँग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत.