होमपेज › Konkan › कोकण स्वराज्य संस्था मतदारसंघ रणधुमाळी सुरु

कोकण स्वराज्य संस्था मतदारसंघ रणधुमाळी सुरु

Published On: Apr 22 2018 11:03PM | Last Updated: Apr 22 2018 11:03PMअलिबाग : विशेष प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या कोकण स्वराज्य संस्था मतदार संघात राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या कन्या रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. तर नारायण राणेंकडे निर्णायक मते असल्याने भाजपाकडून राणे पुत्र माजी खासदार डॉ. निलेश राणे यांना उमेदवारी देण्यासंबंधी चर्चा सुरु झाली आहे.

कोकण स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेस शेकाप आघाडीची जवळपास 450 च्या घरात मते आहेत. तर शिवसेना भाजपाकडे एकत्रित मते जवळपास 400 च्या घरात आहेत. राणेंकडे 100 च्या जवळपास मते आहेत. त्यामुळे राणे या मतदारसंघात निर्णायक ठरणार आहेत. मागील 6 वर्षांपुर्वी राणे काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे राणेंच्या मतांचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे यांना झाला होता. त्यामुळे ते विजयी झाले होते. आता. राजकीय परिस्थिती बदलली आहे. राणेंनी काँग्रेस सोडून भाजपशी दोस्ताना केला आहे. 

भाजपाकडे रायगड जिल्ह्यात पनवेल महापालिका 55 मते, उरण नगरपालिका 13 मते, जिल्हा परिषद रायगड 6, खोपोली 3, कर्जत 2, पेण 5, शिवसेना : महाड 6, माणगाव 5, माथेरान 15, तळा 11,खालापुर 3, उरण 5, रोहा 1, श्रीवर्धन 7, म्हसळा 1, पोलादपुर 12, मुरुड 10,जिप 18 पंचायत समिती 11, राष्ट्रवादीकडे रोहा 15, म्हसळा 16, श्रीवर्धन 11, तळा 6, माणगांव 12, खोपोली 14, मुरुड 7, माथेरान 2, कर्जत 15, खालापुर 3, जिप 13 पंचायत समिती 10, शेकाप अलिबाग 17, पेण 5, खालापुर 10, पनवेल 27, खोपोली 7, काँग्रेस महाड 12, पेण 12 , जिप 4, जिल्हा परिषद शेकाप 23, पंचायत समिती 10 अशी रायगड जिल्ह्यातील संख्यात्मक स्थिती आहे. यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप आघाडीकडे 270 मते आहेत तर युतीकडे 195 मते आहेत, रत्नागीरी जिल्ह्यामध्ये शिवसेना 114 भाजपा 20 अशी 134 मते आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 44 मते आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणेंच्या स्वाभिमानी पक्षाकडे 107, शिवसेना भाजपाकडे 95 तर काँग्रेस राष्ट्रवादीकडे 15 मते आहेत. 

असे बलाबल, अशी रस्सीखेच

32 नगरपालिका, नगरपंचायतींच्या नगरसेवकांची 600 मते 3 जिल्हा परिषद सदस्यांची 160 मते आणि पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांची मिळून 32 मते असे एकून 795 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. सद्य स्थितीतील आकडेवारीवरुन सेना भाजपा आणि स्वाभिमान पक्ष मिळून 397 आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडे मिळून 334 मते आहेत. मनसेकडे 25 मते, अन्य 39 असे मतदार आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना जिंकण्याची संधी असल्याने चुरस अपेक्षीत आहे.
Tags :sindhudurg, ratnagiri, BJP, congress, nilesh rane, narayan rane,