Tue, Jan 21, 2020 10:47होमपेज › Konkan › सावंतवाडी तालुक्यातील ६०० शिक्षकांची पंतप्रधानांना पत्रे

सावंतवाडी तालुक्यातील ६०० शिक्षकांची पंतप्रधानांना पत्रे

Published On: May 06 2018 1:09AM | Last Updated: May 06 2018 12:20AMसावंतवाडी ः प्रतिनिधी 

आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारला जाग आणण्यासाठी अखिल भारती य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने  तालुक्यातील 600 शिक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्रे पाठविली.

येथील तालुका स्कुलमध्ये हा कार्यक्रम झाला. जुनी पेन्शन योजना तत्काळ लागु करावी, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 16 पासून लागू करावा, शिक्षक व शिक्षण विषयक समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक आयोगाची स्थापना करावी, या तीन मागण्यासाठी देशभरात आंदोलने करण्यात आली. यात 25 एप्रिलला एकाचवेळी तहसील कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले. 5 ऑगस्ट 2017  रोजी जिल्हास्तरावर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

शिक्षक दिनादिवशी 5 सप्टेंबर 2017 ला राज्याच्या मुख्यालयी आंदोलन तर 5 ऑक्टोबर 2017 ला दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावर आंदोलने छेडण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून आता सरकारला जागे करण्यासाठी देशातील सर्वानी म्हणजेच 30 लाख शिक्षकांनी तालुका पातळीवरुन वैयक्तिक नावाने पत्र पाठविण्याचा कार्यक़्रम हाती घेतला आहे. सर्व पत्रे एका बॉक्समधून टपाल खात्याकडे देण्यात येणार आहेत.

माजी जिल्हाध्यक्ष म. ल. देसाई, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या मृगाली पालव, तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम शेणई, सरचिटणीस बाबाजी झेंडे, उपाध्यक्ष संजय शेडगे, कार्याध्यक्ष भास्कर गावडे, कोषाध्यक्ष वैष्णवी फाले, वंदना सावंत, नेहा सावंत, विजय गावडे, न्या. ल. सावंत, संजय परब  व इतर शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही पत्रे बाळकृष्ण कालेलकर व सौ. तेली यांच्याकडे देण्यात आली.प्रास्ताविक श्री. देसाई यांनी सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी केले. आभार बाबाजी शेंडे यांनी मानले.