Sun, Nov 18, 2018 22:04होमपेज › Konkan › रत्‍नागिरी : घरात घुसला बिबट्या; गावकर्‍यांची तारांबळ (Video)

रत्‍नागिरी :रानवीत घरात घुसला बिबट्या(Video)

Published On: Jul 10 2018 1:10PM | Last Updated: Jul 10 2018 1:12PMगिमवी (जि. रत्‍नागिरी) : लक्ष्मीकांत घोणसे पाटील 

कोकणात माणसांच्या वस्‍तीत बिबट्या घुसण्याच्या घटना तशा नव्या नाहीत. आता असाच प्रकार गुहागर तालुक्‍यातील (जि. रत्‍नागिरी) रानवी गावात घडला असून बिबट्या थेट घराच्या पडवीत पोहोचल्याने लोकांची तारांबळ उडाली. मंगळवारी पहाटे ही माहिती कळाल्यानंतर वन विभाग आणि पोलिसांकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. 

मंगळवारी पहाटेची वेळ होती. रमेश बारगोडे यांना बिबट्या ओरडल्याचा आवाज येत होता. त्यामुळे त्यांची झोपमोड झाली आणि त्यांनी बाहेर येवून पाहिले. अंधारात हातात बॅटरी होती. अचानक बॅटरीच्या उजेडात समोर बिबट्या बसलेला दिसला. त्यांनी तातडीने घराचा दरवाजा बंद केला आणि पोलिस पाटलाकडे धाव घेतली. पोलिस पाटलांनी वन विभाग आणि पोलिसांना कठविले. 

वन विभाग आणि पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले असून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. दरम्यान, बिबट्याला दुखापत झाली असल्याची शक्यता वन विभागाने वर्तवली आहे. कारण बिबट्याला जागेवरून हालता येत नाही. पण बिबट्या घरात शिरल्याने गावकर्‍यांत भीतीचे वातावरण आहे.