Thu, Apr 25, 2019 22:01होमपेज › Konkan › जिल्ह्यातील पर्यटन विकास नियमावलीस तत्त्वतः मान्यता : दीपक केसरकर

जिल्ह्यातील पर्यटन विकास नियमावलीस तत्त्वतः मान्यता : दीपक केसरकर

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 05 2018 8:39PMकणकवली ः प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्‍यांनी सादर केलेल्या प्रादेशिक पर्यटन विकास नियमावलीसंदर्भात नगररचना संचालकांच्या अभिप्रायान्वये सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास नियंत्रण नियमावलीस तत्त्वतः मान्यता देण्यात आली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) तथा सिंधुदुगर्र् जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

मंगळवारी मंत्रालयात नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास यंत्रणा नियमावलीबाबत बैठक आयोजीत करण्यात आली होती.  यावेळी ना. केसरकर बोलत होते. यावेळी आ. वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, नगरविकास प्रधान सचिव नितीन करीर, कार्यासन अधिकारी अशोक खांडेकर यांच्यासह नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

ना. केसरकर म्हणाले, प्रादेशिक आराखड्यात नगरपरिषद,नगरपंचायत असा शब्द समाविष्ट करण्यासंदर्भातील सूचनेचा सकारात्मक विचार करण्यात येईल. माहिती तंत्रज्ञान औद्योगिकीकरणासाठी परवानगी मिळावी यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. मालमत्ता हस्तांतरणासंदर्भात शुल्क अदा करण्यासंदर्भातील नियमांमध्ये सर्व नगरपंचायतीमध्ये एकसूत्रीपणा असावा. यासंदर्भात अहवालाअंती निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बांधकाम व्यावसायिकांना विविध अटींमुळे उद्भवणार्‍या समस्या, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका यांना येणार्‍या अनेक अडचणींबाबत चर्चा झाली.