Fri, May 24, 2019 09:26होमपेज › Konkan › ‘स्वाभिमान’चे उपोषण आश्‍वासनानंतर स्थगित

‘स्वाभिमान’चे उपोषण आश्‍वासनानंतर स्थगित

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 09 2018 11:11PM

बुकमार्क करा
लांजा : प्रतिनिधी 

लांजा ग्रामीण रुग्णालयाची दुरवस्था व रुग्णांची होणारी गैरसोय यासाठी, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लांजा तालुका व तालुक्यातील नागरिक यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या उपोषणाला तालुक्यातून प्रतिसाद लाभला. या संदर्भात आश्‍वासन देण्यात आल्यावर  उपोषण मागे घेण्यात आले आहे. ‘स्वाभिमान’च्या या उपोषणाची दखल घेत जिल्हा शासकीय आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अधिकार्‍यांनी उपोषणस्थळी दाखल होत ‘स्वाभिमान’ पक्षाला रुग्णालयाच्या मागण्यांबाबत ठोस कृतीची हमी दिली.

मागण्यांबाबत येत्या दि.16 जानेवारीला बैठक घेऊन त्या मार्गी लावण्याचे लेखी आश्‍वासन त्यांनी दिले. या मागण्याबाबात तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असे सांगितल्यावर उपोषण मागे घेण्यात आले.  जर ही बैठक झाली नाही तर आम्ही रुग्णालयाला टाळे ठोकू, असा निर्धार ‘स्वाभिमान’ पक्षाच्या वतीने करण्यात आला. हा उपोषणाचा एल्गार तात्पुरता  स्थगित करण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने संजय यादव जाहीर केले.