Sat, Feb 23, 2019 09:09होमपेज › Konkan › किनार्‍यांवर सुरक्षा यंत्रणेचा अभाव

किनार्‍यांवर सुरक्षा यंत्रणेचा अभाव

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 04 2018 8:58PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात पर्यटनाच्या द‍ृष्टीने विकसित होणार्‍या किनार्‍यांवर सुरक्षा यंत्रणेचा अभाव आहे.  मात्र, याबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे  रविवारी आरे-वारे येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर अधोरेखित झाले आहे.  ग्रामीण पर्यटन विकास  योजनेत जिल्ह्यातील अनेक किनारी गावांचा समावेश आहे. या स्थळांच्या विकासासाठी शासनाने कोट्यवधीचा निधी मंजूर केला आहे. मात्र, येथील सुरक्षा उपाययोजनांबाबत दुर्लक्ष असल्याने पर्यटन व्यवसाय वृद्धीच्या टप्प्यात असलेल्या या किनारी  गावांना दुर्घटनेचे ग्रहण लागले आहे.

ग्रामीण पर्यटन विकास योजनेत जिल्ह्यातील किनार्‍यावरील गावांना विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून येथील पर्यटनासाठी मूलभूत सुविधा उभारताना पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या उपायोजनांचाही समावेश आहे. यासाठी किनारी गावात आपत्ती निवारण प्रशिक्षणे आणि पथकेही सज्ज करण्याचे प्रस्तावित आहे.  काही गावांना सुरक्षिततेच्या साधणेही उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. मात्र, ऊर्जितावस्थेत असलेल्या या पर्यटन स्थळांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने या योजना कागदावरच राहिल्या आहेत.

रत्नागिरी तालुक्यातही अनेक किनारी गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये  भाट्ये, पावस, गावखडी, कुर्ली, कर्ला, रनपार, काळबादेवी, काजीरभाटी, मालगुंड, वरवडे , जयगड  ही गावे यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.  किनारी पर्यटनात प्राधान्याने मुलभूत सुविधांबरोबरच पर्यटकांच्या सुरक्षिततेत्या सुुविधा महत्त्वाच्या असताना या गावात ही योजना केवळ कागदावरच रंगविण्यात आली आहेत. 

काळबादेवी, मिर्‍या किनार्‍यावर गेल्या पावसाळ्यात धूप प्रतिबंधक बंधारा उद्ध्वस्त झाला असताना आता पावसाळ्यात येथे  नव्या उपपायोजना करण्यात आलेल्या नाहीत. हे बंधारे मंजूर  झाले असले तरी त्याबाबत अद्याप कार्यवाही न झाल्याने येथील सुरक्षेच्या उपापयोजना तोकड्या ठरणार आहेत. आरे-वारे हे किनारी गावही ग्रामीण  पर्यन विकासाच समाविष्ट आहे. मात्र रविवारच्या घटनेने येथेही सुरक्षितता वार्‍यावर असल्याचे स्पष्ट झाले.

या किनार्‍यांवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी यंत्रणा असणे आवश्यक आहे. मात्र, या किनार्‍यांवर रविवाव आणि सुट्टीच्या दिवशी असलेल्य वर्दळीने या योजनेतील सुरक्षिततेत नियमितता  नाही. त्यामुळेच आरेवारे यथे रविवारी दुर्दैवी  दुघर्र्टना घडली. गणपतीपुळे हे देशी-विदेशी पर्यटकाच्या पंसतीचे ठिकाण आहे. मात्र, येथेतील किनारा धोकादायक आहे. हे दरवर्षी घडणार्‍या दुघर्र्टनांनी वारंवार अधोरेखित झाले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या नकाशावर झळकणार्‍या या स्थळांवरील ‘किनारा समुद्र स्नानासाठी धोेकादायक आहे’, अशी शासकीय पाटी लावण्याचे सोपस्कार कुचकामी  ठरत आहेत.