Thu, Mar 21, 2019 11:05होमपेज › Konkan › ‘कुणबी’चा ‘एनपीए’ शून्य टक्क्यावर

‘कुणबी’चा ‘एनपीए’ शून्य टक्क्यावर

Published On: Apr 06 2018 11:38PM | Last Updated: Apr 06 2018 11:18PMराजापूर : प्रतिनिधी

राजापूरसारख्या ग्रामीण तालुक्यात सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी बजावताना पंचवीसाव्या वर्षांत पदार्पण करणारी  तालुका कुणबी पतसंस्था ग्रामीण कार्यक्षेत्रात आधुनिक सुविधा देणारी जिल्ह्यातील पहिली पतसंस्था ठरली आहे. चालू वर्षी पतसंस्थेचा ‘एनपीए’ शून्य टक्क्यावर आणला असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश मांडवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चालू वर्ष हे रौप्यमहोत्सवी असल्याने त्यामध्ये  विविध उपक्रम राबविणार असल्याचे मांडवकर म्हणाले. सहकार जागृती व संपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे जिल्हा कार्यक्षेत्र, नवीन शाखा विस्तार व्यवसाय वाढ करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्याची माहिती चेअरमन मांडवकर यांनी माहिती दिली.  यापूर्वी झालेली नोटाबंदी व त्यानंतर ‘जीएसटी’सारख्या घटना घडल्यानंतरही पतसंस्थेने आपला डोलारा सावरला आहे. यावर्षी पतसंस्थेला 41 लाख रुपयांचा नफा झाल्याचे मांडवकर यांनी सांगितले. चालूवर्षी  कर्जवसुलीबाबत कठोर निर्णय घ्यावे लागले त्याचे चांगले परिणाम दिसून आले. एक टक्‍का थकबाकी तर शून्य टक्के ‘एनपीए’ असल्याचे त्यांनी सांगितले. 
 

Tags : Kunabi, NPA, Zero Percent, Rajapur