Fri, Apr 26, 2019 02:03होमपेज › Konkan › सौ. मेहता यांची आंतरराष्ट्रीय अभ्यास परिषदेसाठी निवड

सौ. मेहता यांची आंतरराष्ट्रीय अभ्यास परिषदेसाठी निवड

Published On: Dec 13 2017 1:56AM | Last Updated: Dec 12 2017 8:48PM

बुकमार्क करा

कुडाळ ः वार्ताहर

राज्य मानवाधिकार इंटरनॅशनल हयुमन राईटस् सिस्टिम फेडरेशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला संघटक सौ. सुप्रिया राजू मेहता यांची 12 ते 15 फेब्रुवारी 2018 दरम्यान थायलंड येथे होणार्‍या भारत- थायलंड मैत्री सक्षमीकरण आंतरराष्ट्रीय अभ्यास परिषदेसाठी निवड झाली आहे. या परिषदेत सौ. मेहता  यांना इंटरनॅशनल प्राऊड ऑफ इंडिया या पुरस्कारानेही गौरविण्यात येणार आहे. भारत सरकारच्या कार्पोरेट अफेयर्स मंत्रालयाअंतर्गत नोंदणीकृत व मान्यताप्राप्त  उद्योग समुह असलेल्या डब्लू आय वर्ल्ड इंटेग्रॅटेड सर्व्हिसेस ही भारत थायलंड मैत्री सक्षमीकरणाला समर्पित केली असून, या संस्थेचा जागतिक प्रतिशक्तीच्या एकत्रिकरणाचा महासंकल्प आहे.