Sun, Jul 21, 2019 01:28होमपेज › Konkan › हुतात्मा स्मारकांमध्ये ग्रंथालय निर्मितीसाठी तरतूद : ना. केसरकर

हुतात्मा स्मारकांमध्ये ग्रंथालय निर्मितीसाठी तरतूद : ना. केसरकर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कुडाळ : वार्ताहर

राज्यात हुतात्म्यांची स्मारके उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या स्मारकांच्या अद्ययावत जागेत ग्रंथालयांसाठी विशेष जागेची तरतूद करण्यात येणार असल्याची  गृह (ग्रामीण) वित्त व नियोजन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ग्रंथोत्सव 2017 च्या उद्घाटन प्रसंगी केली. आपले ग्रंथालय चळवळीशी आगळेवगळे नाते असून ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ रूजली पाहिजे यासाठी आपण प्रयत्नरत राहणार अशी ग्वाही त्यांनी दिली.  सद्यस्थितीत राज्यावर शेतकरी कर्जमुक्तीचा मोठा भार असून यानंतर राज्यातील ग्रंथालयांच्या विविध समस्या सोडविण्यासंदर्भात लक्ष देवू असे केसरकर यांनी स्पष्ट केले. हा प्रमुख कार्यक्रम असतानाही जिल्ह्यातील प्रमुख शासकीय अधिकार्‍यांनी पाठ फिरवल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्यावतीने कुडाळ महालक्ष्मी सभागृहात दोन दिवशीय ग्रंथोत्सव 2017 चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ना. केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. आ.वैभव नाईक, मुंबई विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक श्रीमती शालिनी इंगोले, साहित्यिक सोमनाथ कोमरपंत, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह मंगेश मस्के, सभापती राजन जाधव, जि.प.सदस्य नागेंद्र परब, संजय पडते, श्रीम खोचरे, जान्हवी सावंत व  मान्यवर उपस्थित होते. या निमित्त   शहरातून काढण्यात आलेली ग्रंथदिडी लक्षवेधी ठरली.

 ना.  केसरकर म्हणाले, सद्यस्थितीतील युग हे संगणक, टीव्ही, मोबाईल यांनी व्यापले आहे. अशा स्थितीत ग्रंथचळवळ वाढविण्याचे काम असे उपक्रम करत आहेत. वाचनसंस्कृतीत सकारात्मक बदल घडविणारी ही चळवळ आहे.  ग्रंथालयांसाठीचे आवश्यक मागण्यांचे प्रस्ताव द्या.  ग्रंथालय इमारतींचा प्रश्‍न आमदार निधीतून सोडवला जाईल. सद्यस्थितीत ई-लायब्ररीची संकल्पना उदयास येत असून या ई-लायब्ररींना तालुक्यातील हायस्कूले जोडण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.  आ.वैभव नाईक यांनी नवीन ग्रंथालयांच्या परवानगी बाबत राज्यसभेत आपण आवाज उठवू. ग्रंथालयांच्या समस्या मार्गी लागण्यासाठी आपण आपल्या स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.