Sat, Apr 20, 2019 08:49होमपेज › Konkan › शेतीपूरक व्यवसायातून शेतकर्‍यांनी प्रगती साधावी ः राणे

शेतीपूरक व्यवसायातून शेतकर्‍यांनी प्रगती साधावी ः राणे

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 23 2017 9:00PM

बुकमार्क करा

 कुडाळ ः प्रतिनिधी

शेती व शेतीपुरक व्यवसायाकडे  वळा व आपली प्रगती साधा. शेती व्यवसाय करताना कमीपणा बाळगु नका. मुंबई-पुणेमध्ये आता  नोकर्‍या नाहीत, हे लक्षात  ठेवून सिंधुदुर्ग जिल्हापरिषद व सिंधुदुर्ग जिल्हा बँक एकत्रितपणे चांगले उपक्रम  राबवित आहेत त्यांचा लाभ जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी घेवून आपला विकास साधावा, असे आवाहन माजी  मुख्यमंत्री  नारायण राणे यांनी केले.   कृषी व पशुसंवर्धन विभाग, जि. प. सिंधुदुर्ग आयोजित  ‘सिंधु कृषी औद्योगिक पशु-पक्षी मत्स्यव्यवसाय प्रदर्शन व पर्यटन मेळाव्या’चे शनिवारी  कुडाळ एसटी डेपोच्या मैदानावर  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते  उद्घाटन झाले.  

व्यासपीठावर जि.प. अध्यक्ष  सौ. रेश्मा  सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा बँक अध्यक्ष  सतीश सावंत, सभापती राजन जाधव, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एस. पाटील, कुडाळ सभापती राजन जाधव, सभापती संतोष साटविलकर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण आदी उपस्थित होते. श्री. राणे म्हणाले   सिंधुदुर्ग  जिल्ह्यात  अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम  होतात पण हा  एक उपक्रम तुमच्याशी निगडीत आहे. या मेळाव्यातून काहीतरी  बोध घ्या,  सौ. रेश्मा सावंत म्हणाल्या,  गेली चार वर्षे जिल्हा परिषद कृषि मेळावा  राबवून शेतकर्‍यांचे लक्ष वेधत आहे.

शेतकर्‍यांनी त्याचा लाभ घेवून  आपली प्रगती साधावी. सतीश सावंत म्हणाले, या  कृषी प्रदर्शनामुळे  शेतकर्‍यांना  नवीन तंत्रज्ञानाची ओळख निर्माण होवून आवड निर्माण झाली आहे. शेखर सिंह म्हणाले, शेतकर्‍यांच्या उत्पन्नात कशी वाढ होईल यासाठी जि. प. आपल्या सेस निधीतून  अवजार बँक संकल्पना राबविते. प्रास्ताविकात   रणजित देसाई यांनी 2014 पासून सुरू झालेला जिल्ह्याचा आपला कृषि मेळावा आता राज्यव्यापी  झाला. राज्य शासनाने आपला हा सिंधुदुर्ग पॅटर्न राज्यभर  राबविण्यास   ठरविल्याने खर्‍या अर्थाने  हे आपले यश आहे, असे सांगितले. राणेंकडून सतीश सावंतांचे कौतुक
माणगाव खोर्‍यात व परिसरात महिन्याला पाच लाख कोंबड्या तयार होतात. आता या कोंबड्या याच ठिकाणी विकत घेणारी व मार्केटींग करणारी व्यक्ती आपल्याला हवी आहे, अशी सतीश सावंत यांनी विनंती केली असून त्यासाठी मी प्रयत्नात आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्याची ताकद या व्यवसायात आहे.  या व्यवसायातून तुम्ही गरिबीवर मात करू शकता. पैसा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी  कधीही कमीपणा बाळगू नका असे नारायण राणे यांनी सांगून सतीश सावंत यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे  कौतुक केले. पालकमंत्र्यांची मेळाव्याकडे पाठ कुडाळ येथील सिंधु कृषी मेळाव्यात पालकमंत्री दीपक केसरकर प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित होते  मात्र त्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली. विशेष म्हणजे केवळ कुडाळ तालुक्याचे सभापती राजन जाधव वगळता सेनेचे एकही जि.प., पं.स. सदस्य या मेळाव्याला उपस्थित राहिले  नाहीत.