Thu, Apr 25, 2019 11:30होमपेज › Konkan › महिला, युवक केंद्रित स्वयंरोजगार प्रशिक्षणे देणार : ना. प्रभू

महिला, युवक केंद्रित स्वयंरोजगार प्रशिक्षणे देणार : ना. प्रभू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कुडाळ : वार्ताहर

जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणासाठी बचतगट चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. या जिल्ह्यात आता नोकरीपेक्षा व्यवसायाला प्राधान्य दिले जाणार आहे. तशा स्वरूपाची व्यवसायाभिमुख प्रसिक्षणे बेरोजगारांना दिली जाणार आहे. हा जिल्हा हुशार, तरूण,  कष्टकरी महिलांचा जिल्हा आहे. त्यामुळे आता येथील महिला व तरूण वर्गाला आधारभूत मानून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांचा विकास साधला जाणार आहे. यासाठी तरूण व महिलावर्गाने पुढे आले पाहिजे अशे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य उद्योग नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी  केले. यावेळी सुरेश प्रभू यांच्या हस्ते पर्यावरण पूरक इलेक्ट्रीक बाईकचे वितरण प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा 500 बाईक्स वितरीत करण्यात येणार आहेत.

ओ.पी. मुंजाळ फाऊंडेशन,मानव साधन विकास संस्था यांच्या सहयोगाने महिला सक्षमीकरणांतर्गत पर्यावरण पूरक इलेक्ट्रीक बाईक्सचे वितरण  कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात करण्यात आला. व्यासपीठावर मानव साधन विकास संस्था अध्यक्ष सौ. उमा प्रभू, लूपिनचे राज्य व्यवस्थापक रावसाहेब बडे, राजन तेली, अतुल काळसेकर, राजू राऊळ, भाजप वेंगुर्ले तालुकाध्यक्ष बाळू देसाई, नकुल पार्सेकर, चारूदत्त देसाई, योगेश प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरूवातीला प्रातिनिधिक स्वरूपात दहा जणांना या बाईक्सचे वितरण करण्यात आले. यामध्ये संपदा दळवी (दोडामार्ग), दिपाली कदम (दोडामार्ग), नयना गवळी (वेंगुर्ले), तेजस्विनी नाईक (कुडाळ), शैलजा सुतार (वैभववाडी), शुभांगी तांबे (मालवण), सलमा बेगम, रफी आदम शेख (सावंतवाडी), राजश्री तेजम (मालवण), काजल साईल (सावंतवाडी), शुभदा फाटक (देवगड) यांना या बाईक्स देण्यात आल्या. 
ना. सुरेश प्रभू  म्हणाले, लुपिन फाऊंडेशन सद्यस्थितीत लोकांपर्यंत जाऊन शेतकर्‍यांसाठी चांगले काम करत आहे.

हा उपक्रम ओ.पी.मुंजाळ फाऊंडेशनने मानव साधन विकास संस्थेशी थेट संपर्क करून राबवित असून यातील एका बाईक्सची किंमत 45 हजार रू. असून यापुढे 1 लाखांपर्यंतच्या बाईक्स लोकांना वितरीत करण्यात येणार आहेत. देशातले मोदी सरकार हे सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी काम करत आहे. भारत घडविण्यासाठी देशाला नवी दिशा देण्यासाठी हे एक उत्कृष्ट नेतृत्व आहे. आपण कोकणातील माणूस आहे या ओळखीने आपल्याला मंत्रीपद दिले. यापुढे आपण सर्वांनी एकदिलाने काम करूया असे सांगितले. 
 

 

 

tags ; Kudal,news, Women's, Youth,centric, Self,employed,trainings,


  •