कुडाळ : वार्ताहर
आईला जेवायला वाढायला सांगितले. त्यावेळी आई व मुलामध्ये झालेल्या शाब्दिक वादातून अनंत चंद्रकांत चव्हाण (वय 30) या माथेफिरू युवकाने जन्मदात्री मनीषा चंद्रकांत चव्हाण (60) हिच्या डोक्यात सरपणाचे लाकूड मारले आणि जेवणाच्या खोलीत निर्घृण खून केला. श्रीमती मनीषा यांचा गळा धारदार शस्त्राने चिरल्याचेही दिसत होते. मात्र, घटनास्थळावर पोलिसांना कोणतेच धारदार शस्त्र सापडले नाही. ही घटना श्रीमती चव्हाण यांच्या राहत्या घरातच शुक्रवार 30 मार्च रोजी दुपारी 12.30 वा. घडली. याप्रकरणी संशयित अनंत चव्हाण याला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अनंत चव्हाण हा गेले काही दिवस मानसिक स्थिती बिघडल्याप्रमाणे वागत होता. तो सावंतवाडीमध्ये एका सलूनमध्ये कामाला आहे, पण गेले काही दिवस कामाला गेला नव्हता. शुक्रवारी दुपारी अनंत हा घरी आला व आईला जेवायला वाढायला सांगितले. यावेळी आई मनीषा व अनंत यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादात आई त्याला रागारागाने काहीतरी बोलली. त्याचा राग अनावर झाल्याने जेवणाच्या खोलीतीलच सरपणाचे लाकूड उचलून त्याने थेट आईच्या डोक्यावर मारले. तसेच तिच्या तोंडावरही लाकडाचा प्रहार केला. या जबर फटक्याने श्रीमती मनीषा या रक्ताच्या थारोळ्यात कोसळून जागीच गतप्राण झाल्या. श्रीमती मनीषा यांचा सख्खा भाऊ व अनंत याचा मामा बाबली चव्हाण तिच्या घरासमोरच राहतो.
May 06 2018 1:09AM
May 06 2018 1:09AM
May 06 2018 1:09AM
May 06 2018 1:09AM
May 06 2018 1:09AM
May 06 2018 1:09AM