Sun, Aug 25, 2019 12:17होमपेज › Konkan › कोकण विकासासाठी केंद्राचा कालबद्ध कार्यक्रम : ना. प्रभू

कोकण विकासासाठी केंद्राचा कालबद्ध कार्यक्रम : ना. प्रभू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कुडाळ : वार्ताहर

कोकणचा विकास करण्यासाठी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा व त्याला रायगड, ठाणे व पालघर जिल्हे जोडून एक विशेष विकास कार्यक्रम केंद्र सरकारने हाती घेतला आहे. यासाठी विविध संस्था, तज्ज्ञांची बैठक रत्नागिरीत रविवारी घेण्यात आली आहे. कोकण समृद्ध करण्यासाठी केंद्र शासनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्याचा विकास या उपक्रमांतर्गत करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात रत्नागिरी, सिंधुदुर्गपासून करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य व नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी पत्रकार परिषदेत  दिली. 

यापुढे देशांतर्गत विमान वाहतुकीलाही महत्त्व दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील आंब्यासारख्या  नाशवंत वस्तूंची होणारी नासाडी टाळण्यासाठी मालवाहतूक विमानाने करण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. शेतकर्‍यांच्या मालाला योग्य मोबदला व योग्य मार्केट मिळून कोकण समृध्द होईल,  महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत एका कार्यक्रमासाठी  ना. प्रभू कुडाळात आले होते. श्री. प्रभू म्हणाले, कोकणची देशातील महत्त्वाच्या व मोठ्या संस्थांना ओळख नव्हती.

कोकण विकासाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत कोकणची महत्त्वाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन रत्नागिरी येथे ही बैठक घेण्यात आली. या माध्यमातून कोकण विकासाचा एक कालबध्द असा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. केंद्र, राज्य सरकार व जिल्हा प्रशासन एकत्र येऊन हा उपक्रम कार्यक्रम कार्यान्वित करणार आहे. यासाठी चिपी विमानतळाचा वापर करण्यात येणार आहे. रत्नागिरी, गोवा व चिपी  येथील विमानतळे जलदगतीने कार्यान्वित करून ती विमान वाहतूक व  मालवाहतुकीसाठी सक्षम बनविण्यात येणार आहेत.  
 

 

 

 

tags : Kudal,news,Konkan, Development, Special, Development, Program, Central, government,


  •