Thu, Jun 27, 2019 17:46होमपेज › Konkan › ग्लोबल वॉर्मिंग अभ्यासासाठी कोकणची निवड

ग्लोबल वॉर्मिंग अभ्यासासाठी कोकणची निवड

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 22 2017 10:58PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

जागतिक तापमान वाढ तसेच वातावरण बदलाच्या अनुषंगाने उपाययोजनाचा अभ्यास करण्यासाठी कोकणाची निवड करण्यात आली असून आगामी काळात कोकणातील सर्व जिल्ह्यांत कार्बन क्रेडिटचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोेषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अलिकडेच केली.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे वातावरणात होणारे बदल भविष्यात घातकठरण्याची भीती असल्याने यावर सर्वात जवळचा उपाय म्हणजे कार्बन उत्पादनाचे नियोजन करणे आहे. यासाठी कार्बव क्रेडिट व्यस्थापन करण्यात येणार आहे. यासाठी प्रायोगिक तत्वावर कोकण विभागाची निवड करण्यात आली आहे.

प्रदूषणामुळे स्वाईन फ्लूच्या विषाणूंची तसेच डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूवरील लसीवर दरवर्षी संशोधन करुन आंतरराष्ट्रीय बाजारातून मागवावी लागते. सध्या होत असलेल्या प्रदूषणावर उपाययोजना करण्याची गरज असून कार्बन क्रेडिटचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. घर अथवा इतर ठिकाणातून बाहेर पडताना रेफ्रिजरेटर, ए. सी. बंद करुन बाहेर पडणे गरजेचे आहे. यामुळे तापमानवाढीवर नियंत्रण आणता येणे शक्य होणार आहे.