Fri, Apr 26, 2019 02:03होमपेज › Konkan › कोकण मार्गावरील डबल डेकर आता सहा डब्यांची 

कोकण मार्गावरील डबल डेकर आता सहा डब्यांची 

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 26 2018 11:11PMमुंबई : प्रतिनिधी 

कोकण, गोवा मार्गावर अवघ्या दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या वातानुकूलित डबल डेकर एक्स्प्रेसला प्रवाशांकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या गाडीचे दोन डबे कमी करण्यात आले आहेत. आता ही गाडी आठऐवजी सहा डब्यांची असणार आहे. भविष्यात प्रवासी संख्येत वाढ न झाल्यास डबल डेकर बंद केली जाईल, अशी माहितीही रेल्वे अधिकार्‍यांनी दिली.

मध्य रेल्वेने 2015 या वर्षी लोकमान्य टिळक टर्मिनस-मुंबई ते करमाळी या मार्गावर वातानुकूलित डबल डेकर एक्स्प्रेस सुरू केली. सुरुवातीला प्रीमियम प्रवासदर आकारला जात होता. मागणीनुसार हे भाडे वाढत असल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागत होती. त्यानंतर दरनिश्‍चित करण्यात आले. मात्र, डबल डेकरची लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 5.30 वाजता सुटण्याची वेळ, पश्‍चिम उपनगरातील रहिवाशांना गाडी पकडण्यासाठी करावी लागणारी कसरत या प्रवाशांच्या दोन्ही अडचणी दूर करण्यासाठी एक्स्प्रेसची रवाना होण्याची वेळ बदलण्याची मागणी केली गेली.