Mon, Apr 22, 2019 16:32होमपेज › Konkan › ‘कोकण साम्राज्य’ सागरी नौका भ्रमण १७ पासून

‘कोकण साम्राज्य’ सागरी नौका भ्रमण १७ पासून

Published On: Jan 13 2018 1:13AM | Last Updated: Jan 12 2018 10:10PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी रत्नागिरीतर्फे  छ़  शिवाजी महाराज  ‘कोकण साम्राज्य’  सागरी मोहीम 2019 चे  17 जानेवारी ते 26 जानेवारी 2018 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे़   या मोहिमेंतर्गत 2  शिडाच्या  27 फुटी बोटीतून  10 दिवसांत  10 बंदरांना भेट देण्यात येणार आहे़  रत्नागिरी, कोल्हापूर, सावंतवाडी येथील 25 छात्र या मोहिमेत सहभागी होणार आहेत. यावेळी समाज प्रबोधनही करण्यात येणार असल्याची माहिती  2  महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी रत्नागिरीचे  व या मोहिमेचे प्रमुख कॅ. नीळकंठ खौंड यांनी पत्रकार परिषदेत दिली़

‘कोकण साम्राज्य’ सागरी मोहिमेबाबत सविस्तर माहिती देताना कॅ. खौंड यांनी सांगितले की, ‘कोकण साम्राज्य’ सागरी मोहिमेचा प्रारंभ  17 जानेवारीला सकाळी 10 वाजता भगवती बंदर येथून होणार आहे़   2 महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी रत्नागिरी कार्यालयाच्या संपूर्ण कार्यकालावधीत या मोहिमेची नवव्यांदा ऐतिहासिक गणना होणार आहे़

  हा उपक्रम अखिल भारतीय सागरी नौका भ्रमण मोहीम स्पर्धा  2018 - 19  च्या  जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे यशस्वीपणे धुरा पूर्ण करेल, असा विश्‍वास कॅ़  खौंड यांनी व्यक्‍त केला़
या मोहिमेत  25 छात्रांसह अधिकारी मिळून 43  जणांचे पथक सहभागी होणार आहे़   2 शिडाच्या  27 फुटी बोटीतून  10  दिवसांत 10  बंदरांना भेटी देण्यात येणार आहेत. यामध्ये कोकण किनारपट्टीवरील वरवडे, जयगड, बोर्‍या, पालशेत, दाभोळ, हर्णे, मुरूड,वेलदूर,तवसाळ, रत्नागिरी इ़  बंदरांचा समावेश आहे़  छात्र सैनिकांना पाण्यातील साहसी व धाडसीवृत्तीला चालना देणे, त्यासाठी विश्‍वास, शक्‍ती, मानसिकवृत्ती अधिक बळकट करणे व सागरी जीवनाचा अनुभव प्राप्त करणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे़  असे असले तरी बंदरानजीक लोकवस्तीत पथनाट्याच्या माध्यमातून गावातील गावकरी, युवक,स्त्रिया इत्यादिंना स्त्रीमुक्‍ती सुधारणा, प्रथमोपचार, पर्यावरण संतुलन, समुद्री पर्यावरणाचे संतुलन, महात्मा गांधी स्वच्छता अभियान यासह व्यसनमुक्‍ती, एड्स, याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे़