Fri, Nov 16, 2018 02:25होमपेज › Konkan › कोलगावात जुगार अड्ड्यावर छापा

कोलगावात जुगार अड्ड्यावर छापा

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 21 2018 10:32PMसावंतवाडी : शहर वार्ताहर

कोलगाव येथे माळरानावर छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सावंतवाडी पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा छापा टाकला. जुगार खेळणार्‍यांपैकी तीन जणांना ताब्यात घेतले. यावेळी रोख रकमेसह 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक योगेश जाधव, पोलिस उपनिरीक्षक अमित गोते, देवानंद माने, समीर सुतार, भूषण मळगावकर, बाबी देसाई, प्रशांत धुमाळ आदींनी या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

पोलिसांनी सिकंदर अबूबक्‍कर शहा, देवदत्त मनोहर शेळके, सुदर्शन देवराव मुळीक यांना ताब्यात घेतले.  10,500 रुपये रोख, दोन मोबाईल, गॅसबत्ती असा 25 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. दरम्यान, नरेंद्र डोंगर येथे जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर तेथे गेलेल्या पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. सध्या गाजत असलेल्या गांजा प्रकरणामुळे पोलिसांची अवैध धंद्यांवर ‘करडी’ नजर पडल्याचे बोलले जात आहे.