Thu, Apr 25, 2019 13:59होमपेज › Konkan › एकतर्फी प्रेमातून मुलीवर चाकूहल्ला

एकतर्फी प्रेमातून मुलीवर चाकूहल्ला

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 08 2018 10:25PM

बुकमार्क करा
आरवली : वार्ताहर

संगमेश्‍वर तालुक्यातील माखजन येथे एकतर्फी प्रेमातून रोशन भीमदास कदम (वय 21) या तरुणाने अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला करून नंतर स्वतःवरही वार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. या हल्ल्यात तरुणीही गंभीर जखमी झाली आहे.

रोशन माखजन येथील कॉलेजमध्ये शिकत असताना त्याची एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. रोशन तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. त्याने तिला ‘मी तुझ्याशी लग्न करेन’, असे वचनही दिले होते; मात्र, तिचा याला विरोध होता. दुसरीकडे  रोशनला  या मुलीचे सध्या दुसर्‍याच मुलाशी प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय  होता. याच रागातून त्याने हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे.

या घटनेतील हल्लेखोर रोशन कदम हा कामानिमित्त मुंबईत असायचा. शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा असल्याने तो माखजन दोन दिवसांपूर्वीच आला होता. मुलीवर हल्ला केल्याच्या घटनेनंतर माखजन येथे एकच खळबळ उडाली असून परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली.