Fri, Jul 19, 2019 05:06होमपेज › Konkan › ‘किंग ऑफ द रोझ शो’ स्मिता पानवलकर!

‘किंग ऑफ द रोझ शो’ स्मिता पानवलकर!

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 15 2018 12:21AM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

रोझ सोसायटीतर्फे गुलाब पुष्प प्रदर्शन आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये  ‘किंग ऑफ द शो’साठी स्मिता पानवलकर आणि ‘क्‍विन ऑफ द शो’ साठीचा उत्कृष्ट गुलाबपुष्प पुरस्कार पराग पानवलकर यांच्या गुलाबपुष्पाने पटकावला.  या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी 11.00 वाजता झाले. उद्घाटन प्रसंगी लायन्स क्‍लबचे अध्यक्ष राजन मोरे, रोटरीचे अध्यक्ष निलेश मुळ्ये आदी उपस्थित होते. रत्नागिरीतील रोझ सोसायटीतर्फे गुलाब पुष्प प्रदर्शन आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. गुलाब व इतर शोभिवंत फुले, झाडे यांची आवड नागरिकांमध्ये रुजावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दि. 14 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वा. गोदूताई जांभेकर विद्यालय येथे झाली.

विविध गटात झालेल्या या स्पर्धेतील कुंड्या फुलांसहित गटात प्रथम सुधीर मुळे, द्वितीय रफिका डिंगणकर, उत्तेजनार्थ अनिस गिनीवाले. कुंड्या फुलांविरहित गटात प्रथम स्मिता पानवलकर, द्वितीय शिवानी पानवलकर, उत्तेजनार्थ धरमसी चौहान. पुष्प रचना गटात प्रथम समीना शेटे, द्वितीय रसिका तेरेदेसाई, उत्तेजनार्थ रसिका डिंगणकर. पुष्परांगोळी गटात प्रथम प्रिशा गांगण, द्वितीय श्रुतिका सावंत, उत्तेजनार्थ अक्षता जाधव. मिनीएचर गुलाब गटात प्रथम अनिस गिनीवाले, द्वितीय आणि उत्तेजनार्थ रफिका डिंगणकर. हँगिंग कुंड्या गटात प्रथम स्वयंम पानवलकर, द्वितीय आणि उत्तेजनार्थ रफिका डिंगणकर. बाय कलर गटात प्रथम व द्वितीय अनिस गिनिवाले, उत्तेजनार्थ सांडिम. फ्लोरी बंडा गटात प्रथम रफिका डिंगणकर द्वितीय स्मिता पानवलकर, उत्तेजनार्थ सुधीर मुळे. विविध प्रकारच्या गुलाबमध्ये रेड कलर विनय गांगण, ब्लॅक सुधीर मुळे, व्हाईट अनिस गिनिवाले, पिवळा विनय गांगण, जांभळा अनिस गिनिवाले, नोव्हाईस विनय गांगण, पूर्ण फुललेले सांडिम, ऑरेंज अनिस गिनिवाले, तर नवोदितमध्ये सेन्हा कारेकर यांना गौरवण्यात 
आले.

स्पर्धेतील गुलाबपुष्पचे परीक्षण डॉ. किरण मालसे आणि मनोज दामले, कुंड्यातील पुष्परचनेचे परीक्षण विजय डोंगरे आणि डॉ. संतोष बेडेकर, तर पुष्परचना आणि पुष्प रांगोळीचे परीक्षण नीता सोमशेट्टी आणि दीपा गोगटे यांनी केले. सायंकाळी 5.00 वा. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. या प्रदर्शनाला रत्नागिरीतील नागरिकांनी दिवसभर गर्दी केली होती. प्रदर्शनाला भेट दिलेल्या काही नागरिकांनी गुलाबाच्या रोपांची खरेदीही केली. हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी रोझ सोसायटीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी मेहनत घेतली.