Fri, Jul 19, 2019 18:00होमपेज › Konkan › पीरलोटेत एस.टी.च्या धडकेत दोघे ठार

पीरलोटेत एस.टी.च्या धडकेत दोघे ठार

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 21 2018 11:00PMखेड : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर पीरलोटे घाटात विठ्ठलवाडी-गुहागर एस.टी. बसची दुचाकीला धडक बसून दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले आहेत. या अपघातात मजरेकाशी येथील ऋषीकेश राजाराम भुवड (वय 20) आणि रोहित किरण भुवड (21) हे दोघे  तरुण ठार झाले आहेत.

विठ्ठलवाडी-गुहागर ही बस चिपळूणच्या दिशेने येत  असताना पीरलोटे घाटात रविवारी  दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची मजरेकाशी येथे खबर देण्यात आली आणि काही ग्रामस्थांनी लोटेकडे धाव घेतली. एकाच वाडीतील दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याने मजरेकाशीवर शोककळा पसरली आहे.