Sat, Sep 22, 2018 12:39होमपेज › Konkan › रिक्त पद भरावे, अन्यथा आंदोलन : परकार

रिक्त पद भरावे, अन्यथा आंदोलन : परकार

Published On: Dec 13 2017 1:56AM | Last Updated: Dec 12 2017 9:09PM

बुकमार्क करा

खेड : प्रतिनिधी

खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी पद गेली दोन वर्षे रिक्त आहे. पद रिक्त असल्याने सातत्याने या पदावर प्रभारी पदावर अधिकार्‍यांची नियुक्ती केली जात आहे. त्यामुळे शिक्षण विभागातील अनेक प्रकरणे रखडत आहेत. याची मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नोंद घेऊन तत्काळ हे पद भरावे,  अन्यथा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सुसेरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या नफीसा परकार यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे.

पंचायत समितीमध्ये दोन वर्षांपासून गटशिक्षणाधिकारी पद रिक्त आहे. त्यामुळे शिक्षण विभागात अनेक शिक्षकांचे अनेक प्रश्‍न व समस्या मार्गी लावण्यात आणि शिक्षकांना न्याय देण्यास विलंब लागत आहे. प्रलंबित शैक्षणिक समस्या मार्गी लावण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. असलेल्या शिक्षकांना कमी शाळांकडे वर्ग केले जाण्याची शक्यता आहे. शिक्षणाविषयी अनेक समस्या मार्गी लावण्यासाठी आणि शैक्षणिकस्थिती सुधारण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गटशिक्षणाधिकारी हे महत्वाचे असे पद का भरत नाहीत, असा आरोप केला आहे.हा आरोप करतानाच गटशिक्षणाधिकारी पद तत्काळ भरावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद सदस्या नफीसा परकार यांनी दिला.