Mon, Jun 24, 2019 16:36होमपेज › Konkan › नातूवाडी मधून खेडला पाणीपुरवठा करणार

नातूवाडी मधून खेडला पाणीपुरवठा करणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

खेड : प्रतिनिधी

शहरापासून काही अंतरावर असलेल्या नातूवाडी धरणातून शहराला गुरूत्वीय बलाने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव असून आगामी एक वर्षाच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्‍वासन पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी येथे दिले. रविवारी शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी गुलमोहर पार्क येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जि. प. बांधकाम  सभापती चंद्रकांत कदम, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्यासह सर्व नगरसेवक व गुलमोहर पार्क येथील रहिवासी उपस्थित होते. यावेळी ना.वायकर म्हणाले, खेड शहरातील पाणी योजनेसाठी दोन वर्षांपूर्वीच निधी दिला आहे.

नातूवाडी धरण खेडमध्ये असताना शहर पाण्यापासून वंचीत राहणे याला विकासाचा दृष्टीकोन म्हणत नाहीत. चिपळूण शहरासाठी कोयनेचे अवजल पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कोकणात वीज, पाणी, शौचालय या विषयांवर गेल्या कित्येक वर्षापासून ग्रामपंचातीपासून ते खासदारकीपर्यंत निवडणुका लढविल्या जात आहेत, हे चित्र बदलणे गरजेचे आहे.  ते पुढे म्हणाले, कोकणात वीज पुरेशी असली तरी शहर व गावांमध्ये सातत्याने खंडीत होणारा वीज पुरवठा व सोमवारी नियोजनबद्धपणे खंडीत केला जाणारा वीज पुरवठा रोखण्यासाठी प्रयत्न करत आहोत. गेल्या सत्तर वर्षात लोकांना आम्ही पाणी देवू शकत नाही यात काहीतरी चुकते आहे.

विकासाचा दृष्टीकोन ठेवून पायाभूत सुविधा नागरिकांना देण्यासाठी राजकारण निवडणुकांपुरते ठेवून विकासासाठी एकत्रीत काम करणे गरजेचे आहे.  महाडनाका परिसरासाठी स्वतंत्र गुरूत्ववाहीनी बांधणे, कुंभारआळी येथील सदगुरू घर ते निवाचा चौक दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण करणे, क्रीडांगण शेजारील रस्त्याचे डांबरीकरण करणे, जिजामाता उद्यान ते गांधी चौक दरम्यान रस्ता डांबरीकरण करणे, गणपती मंदिर ते कासारआळी ब्राह्मणआळी ते कन्याशाळेपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे, शिवाजी चौक ते अनंत कान्हेरे चौक पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे आदी कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.  
 

 

 

 

tags ; Khed,news,Water, supply, proposal,city ,from ,Nathwadi, dam,


  •