Tue, Nov 13, 2018 08:34होमपेज › Konkan › दुबईतील कोकणी मेळाव्याला प्रतिसाद

दुबईतील कोकणी मेळाव्याला प्रतिसाद

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 10:23PMखेड : प्रतिनिधी

आखाती देशातील दुबई येथे हॉलिडे हॉटेलमध्ये नुकताच कोकणी मेळावा पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन सॉलिसीटर इन्व्हेस्टर कंपनीतर्फे करण्यात आले होते. उद्घाटन कोकणचे सुपुत्र, उद्योजक बशीर हजवानी यांच्या हस्ते झाले.
या मेळाव्याचे आयोजन चिपळूणचे उद्योजक नासीर खोत यांच्या भगिनी आणि चिपळूण तालुक्यातील पोसरे गावचे सिराज खोत यांची कन्या सबिना खोत (शेख) यांनी केले होते. यावेळी ‘जेएमबीआर’ कंपनीचे संचालक जिबरान हजवानी उपस्थित होते. सांस्कृतिक आणि मेजवानीचा हा कार्यक्रम प्रथमच दुबईत झाला. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने कोकणी लोकांनी हजेरी लावली.

कोकणी मेळाव्याच्या प्रमुख सबिना खोत यांनी पुढील वर्षी  मैदानात मेळाव्याचे आयोजन करण्याचा मनोदय व्यक्‍त केला. कोकणातील सर्वप्रकारचे खाद्यपदार्थ या मेळाव्यात ठेवण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर बशीर हजवानी यांचे सर्वांनी स्वागत केले. त्यांचे सुपुत्र बशीर हजवानी यांनीही अशीच लोकप्रियता मिळवली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून संगमेश्‍वर तालुक्यातील कडवई येथील अशफाक मोडक, गुहागर तालुक्यातील पेवे येथील अफझल खान सरगुरो, खेड तालुक्यातील बहिरवलीचे खालीद चौगुले उपस्थित होते. आयोजक सबिना खोत (शेख) यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.