Wed, Nov 14, 2018 23:31होमपेज › Konkan ›

खैराची अवैध वाहतूक करणारा ट्रक ताब्यात
 

खैराची अवैध वाहतूक करणारा ट्रक ताब्यात
 

Published On: Apr 05 2018 2:12AM | Last Updated: Apr 05 2018 12:09AMशिरगाव : वार्ताहर

पाटण ते पालवण अशी खैराची बेकायदेशीर वाहतूक करताना वन विभागाने पोफळी नाका येथे ट्रक व खैरासह दहा लाखांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. यामुळे परजिल्ह्यातून या भागात खैराच्या लाकडाची अवैध वाहतूक सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरा हा प्रकार घडला.

येथील लाकूड व्यापारी महेंद्र गणपत मोहिते, आत्माराम सखाराम पवार हे दोघे पाटण ते पालवण अशी ट्रकद्वारे खैराची वाहतूक करीत होते. पोफळी नाका येथे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी या ट्रकची तपासणी केली. यावेळी ट्रकमध्ये खैराचे लाकूड असल्याचे आढळून आले. वनरक्षक गणेश खेडेकर, रामदास खोत यांनी परवान्याची विचारणा केली असता परवाना नसल्याचे सांगितले.