Tue, Jul 16, 2019 01:57होमपेज › Konkan ›

उडेली ग्रा.पं.च्या ११० एकर जमिनीवर केरळीयनांचा कब्जा
 

उडेली ग्रा.पं.च्या ११० एकर जमिनीवर केरळीयनांचा कब्जा
 

Published On: Apr 05 2018 2:12AM | Last Updated: Apr 05 2018 12:33AM सावंतवाडी : दत्तप्रसाद पोकळे

यापूर्वी भूमिहिनांच्या जमिनी बळकावणार्‍या केरळीयनांनी घारपी-उडेली येथे ग्रामपंचायतीच्या 110 एकर जमिनीवरही बेकायदा कब्जा करून रबराची लागवड केली आहे. केवळ 650 एकर जमीन ताब्यात असतानाही घारपी उडेलीत केरळीयनांनी 1500 एकर जमिनीवर रबराची लागवड केली आहे. जवळपास 850 एकर जमिनीवर त्यांनी अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे. यात महाराष्ट्र शासन व ग्रामस्थांच्या जमिनींचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी सावंतवाडीचे  प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार सतीश कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या एका आदेशांतर्गत घारपी उडेली येथील केरळीयनांच्या प्लांटेशनची पाहणी केली होती. यावेळी या केरळीयनांनी केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाची वस्तुस्थिती समोर आली. काही ग्रामस्थांनीही यावेळी संबंधित अधिकार्‍यांकडे केरळीयनांनी केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाची तक्रार केल्याचे समजते. केरळीयनांनी केलेल्या अतिक्रमणांबाबत सर्व्हे करून त्यांनी कब्जा केलेली जमीन काढून घेतली जाणार आहे.