Sun, Aug 25, 2019 12:18होमपेज › Konkan › स्वाभिमान-भाजपमध्ये लक्षवेधी दुरंगी लढत

स्वाभिमान-भाजपमध्ये लक्षवेधी दुरंगी लढत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कणकवली : अक्षय पावसकर   

कणकवली नगरपंचायत हद्दीतील प्रभाग 7 मध्ये मुख्य बाजारपेठेचा उत्तर भागाचा व भालचंद्रनगरचा समावेश होतो. या प्रभागात स्वाभिमान विरुद्ध भाजप अशी दुरंगी लढत होणार आहे. विद्यमान नगरसेवक समीर नलावडे यांचा बालेकिल्ला म्हणून या प्रभागाकडे पाहिले जाते. या वेळी नलावडे यांची पत्नी स्वाभिमानच्या उमेदवार म्हणून या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. सहाजिकच या लक्षवेधी लढतीत समीर नलावडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या प्रभागात बाजारपेठेचा विकास मात्र झालेला नाही. 

 या प्रभागात एकूण 1079 असे सर्वाधिक मतदार आहेत. त्यात  519 पुरुष 560 महिलांचा समावेश आहे. सर्वसाधारण महिला आरक्षीत या प्रभागात स्वाभिमानतर्फे  सौ. सुप्रिया समीर नलावडे तर भाजपच्या उत्कर्षा उत्तम धुमाळे  निवडणूक रिंगणात आहेत. समीर नलावडे यांनी सलग 3 वेळा या प्रभागाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीला ही निवडणूक काहीशी सोपी जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, प्रत्यक्षात जनता कुणाच्या बाजूने कौल देणार या विषयी उत्सुकता आहे.  

मुख्य बाजारपेठेचा समावेश असलेल्या या प्रभागात वाहतूक कोंडी,मोकाट जनावरांचा प्रश्‍न, सांडपाण्याने तुंबलेली गटारे आदी समस्या आहेत.रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे, दुकाने असल्याने हा भाग सदैव गजबजलेला असतो. शहराची ही मुख्य बाजारपेठ अरुंद असून त्यात फिरते विक्रेते, रस्त्यालगत पार्क होणारी वाहने यामुळे सतत वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. पावसाचे पाणी जाण्यासाठी पटकीदेवी ते कांबळी गल्लीपर्यंत बंदिस्त गटारे असली तरी झेंडा चौक ते पटवर्धन चौकपर्यंत अशी गटारे नाहीत. बाजारपेठेत एक दिशामार्ग तसेच सम, विषम तारखांना पार्किंगची तरतूद करण्यात आलेली आहे. याखेरीज बाजारपेठेचा भाग नो  हॉकर्स झोन म्हणूनही जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र, या सर्वांची या अंमलबजावणी होत नाही. याचा फटका नागरिकांसह व्यापार्‍यांना बसत आहे. 
 


  •