Thu, Jul 18, 2019 04:08होमपेज › Konkan › कणकवली न.पं. निवडणूक : १२ हजार ५२५ मतदार निश्‍चित

कणकवली न.पं. निवडणूक : १२ हजार ५२५ मतदार निश्‍चित

Published On: Mar 05 2018 8:51PM | Last Updated: Mar 05 2018 8:27PMकणकवली : प्रतिनिधी

कणकवली नगरपंचायतीच्या एप्रिलमध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 12 हजार 525 मतदार निश्‍चित करण्यात आले आहेत. यामध्ये प्रभाग 7 मध्ये सर्वाधिक 1079 तर प्रभाग 2 मध्ये सर्वात कमी 437 मतदार आहेत. यावर्षीच्या निवडणुकीसाठी 1331 एवढ्या वाढीव मतदारांची भर पडली आहे. पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीवेळी 11 हजार 194 मतदार होते.  17 प्रभागांसाठी पाच केंद्रांवर मतदान होणार आहे. 

नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदारांची प्रभागनिहाय यादी नगरपंचायतीकडून जाहीर करण्यात आली आहे. या मतदार याद्यांवर 107 हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी पूर्ण करून प्रांताधिकारी तथा नगरपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली आहे. त्यानुसार प्रभाग क्र. 1 मध्ये 980, प्रभाग 2 मध्ये 437, प्रभाग 3 मध्ये 724, प्रभाग 4 मध्ये 582, प्रभाग 5 मध्ये 645, प्रभाग 6 मध्ये 754, प्रभाग 7 मध्ये 1079, प्रभाग 8 मध्ये 703, प्रभाग 9 मध्ये 821, प्रभाग 10 मध्ये 709, प्रभाग 11 मध्ये 674, प्रभाग 12 मध्ये 787, प्रभाग 13 मध्ये 818, प्रभाग 14 मध्ये 862, प्रभाग 15 मध्ये 583, प्रभाग 16 मध्ये 622, प्रभाग 17 मध्ये 745 असे मतदार आहेत. आता कोणत्याही क्षणी निवडणूक तारीख आणि आचारसंहिता घोषित होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर निवडणुकीची सर्व तयारी नगरपंचायत प्रशासनाने पूर्ण केली आहे. 

शहरातील रा.बा. उचले शाळा क्र. 1, श्री स्वयंभू विद्यामंदिर शाळा क्र.2, सद‍्गुरू भालचंद्र विद्यालय शाळा क्र.3, जि.प. शाळा क्र. 4 आणि विद्यामंदिर हायस्कूल अशी पाच मतदान केंद्रे निश्‍चित झाली आहेत. प्रभाग 1 साठी शाळा क्र. 2 पहिलीचा वर्ग, प्रभाग 2 साठी शाळा क्र. 2 सहावीचा वर्ग, प्रभाग 3 साठी शाळा क्र. 2 पाचवीचा वर्ग, प्रभाग 4 साठी विद्यामंदिर हायस्कूल रूम क्र. 12, प्रभाग 5 साठी विद्यामंदिर हायस्कूल रूम क्र. 16, प्रभाग 6 साठी विद्यामंदिर हायस्कूल रूम क्र. 28, प्रभाग 7 साठी शाळा क्र. 3 इमारत क्र. 1, प्रभाग 9 साठी शाळा क्र. 3 इमारत क्र. 3, प्रभाग 10 साठी शाळा क्र. 1 इमारतीचा उत्तर भाग, प्रभाग 11 साठी शाळा क्र. 1 इमारतीचा पश्‍चिम भाग, प्रभाग 12 साठी शाळा क्र. 4 अंगणवाडी इमारत, प्रभाग 14 साठी शाळा क्र. 4 शिक्षण विभाग कार्यालय, प्रभाग 15 साठी विद्यामंदिर हायस्कूल रूम क्र. 13, प्रभाग 16 साठी शाळा क्र. 5 अंगणवाडी इमारत, प्रभाग 17 साठी शाळा क्र. 5 दुसरीचा वर्ग अशी मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.