Mon, Apr 22, 2019 11:42होमपेज › Konkan › कणकवलीत ५९ उमेदवार रिंगणात

कणकवलीत ५९ उमेदवार रिंगणात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी  नगराध्यक्षपदासाठी 6 पैकी दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चार उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर नगरसेवकपदासाठी 8 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. 55 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, प्रभाग क्र. 10 मधील दोन उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात केलेल्या अपिलावर सोमवारी सायंकाळपर्यंत  निर्णय न झाल्याने या प्रभागातील चित्र  स्पष्ट झालेले नाही. तरीही यापूर्वी वैध ठरलेले 3 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, इतर चित्र स्पष्ट झाल्याने नगराध्यक्षपदासाठी चौरंगी, तर प्रभागांमध्ये काही ठिकाणी दुरंगी, काही ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढत होणार आहे. स्वाभिमान, भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना बंडखोरांना थंड करण्यात यश आले आहे. 

नगराध्यक्षपदासाठी  सोमवारी स्वाभिमानचे अपक्ष उमेदवार अभय अरविंद राणे आणि कणकवली विकास आघाडीचे अजित यशवंत राणे यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी संदेश पारकर (भाजप-सेना युती), समीर नलावडे (स्वाभिमान-राष्ट्रवादी आघाडी), विलास बाळकृष्ण कोरगावकर (काँग्रेस) आणि राकेश बळीराम राणे (कणकवली विकास आघाडी) हे रिंगणात आहेत. मंगळवारी सकाळी 11 वा. कणकवली तहसील कार्यालयात उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. विशेषतः महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी या नवीन पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली असली तरी त्यांना अद्याप चिन्ह मिळाले नाही. 

बंड थंड करण्यासाठी  करावी लागली कसरत

गेले काही दिवस स्वाभिमान, भाजप आणि शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांना अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांची समजूत काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती. यामध्ये स्वाभिमानचे अभय राणे यांनी नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेला अपक्ष अर्ज मागे घेतल्याने अधिकृत उमेदवार समीर नलावडे यांना दिलासा मिळाला आहे.

तर प्रभाग क्र. 7 मधून स्वाभिमानच्या अपक्ष उमेदवार माया सांबे्रेकर यांनीही अर्ज मागे घेतल्याने स्वाभिमानच्याच सुप्रिया नलावडे यांचाही मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे प्रभाग क्र. 5 मधून  अपक्ष अर्ज दाखल केलेल्या राजश्री धुमाळे यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपला दिलासा मिळाला. प्रभाग क्र. 13 मध्ये प्रशांत नाईक यांनी अपक्ष अर्ज मागे घेतल्याने त्यांचेच चुलत  बंधू सुशांत नाईक यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे.  

 

Tags : Kankavli, Kankavli news, Kankavli Municipal Panchayat, Election,


  •