Sat, Jul 20, 2019 08:37होमपेज › Konkan › लक्षवेध सीईटी, नीट सराव परीक्षा 21, 22 रोजी

लक्षवेध सीईटी, नीट सराव परीक्षा 21, 22 रोजी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कणकवली : वार्ताहर

सिंधुदुर्ग बँक व एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने लक्षवेध सीईटी, नीट सराव परीक्षा 21 व 22 एप्रिल रोजी होणार आहे. सीईटी, नीट मुख्य परीक्षेचे कोणतेही दडपण मुलांवर राहू नये तसेच त्यांना सराव व्हावा यासाठी ही परीक्षा सलग तिसर्‍या वर्षी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.

सिंधुदुर्ग बँकेच्या कणकवली शहर शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत सतीश सावंत यांनी लक्षवेध सराव परीक्षेच्या आयोजनाची माहिती दिली. एसएसपीएम महाविद्यालयाचे प्राचार्य संजय सांगे, सिंधुदुर्ग बँकेचे अधिकारी एस.पी. सावंत, प्रा. सुयोग सावंत आदी उपस्थित होते. सिंधुदुर्गचा मागील पाच वर्षाचा बारावी परीक्षेचा निकाल राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सरासरी चांगला आहे. परंतु उच्च शिक्षण त्यामध्ये वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्राकडे जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे.

सीईटी सराव परीक्षा 21 एप्रिल रोजी तर नीट सराव परीक्षा 22 एप्रिल रोजी स. 9 वा. एसएसपीएम महाविद्यालय येथे होणार आहे. परीक्षेचे नोंदणी अर्ज 4 ते 13 एप्रिल कालावधीत सिंधुदुर्ग बँकेच्या नजीकच्या शाखेत 11.30 ते 4.30 या वेळेत उपलब्ध केले जाणार आहे. तर हॉल तिकीट परीक्षेपूर्वी स. 8.30 ते 9 या वेळेत एसएसपीएम महाविद्यालयात दिले जाणार आहे. मुख्य परीक्षेच्या दर्जाची प्रश्‍नपत्रिका सराव परीक्षेसाठी असणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी एसएसपीएम महाविद्यालय तसेच रजिस्ट्रार सागर सईकर, प्रा. समीर वायंगणकर, प्रा. सुशांत डगरे, प्रा. सुयोग सावंत, अनाजी सावंत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सतीश सावंत यांनी केले. 
 


  •