Sun, Jul 21, 2019 16:13
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › अशी आहे कणकवली न.पं.ची प्रारूप प्रभाग रचना

अशी आहे कणकवली न.पं.ची प्रारूप प्रभाग रचना

Published On: Dec 10 2017 1:20AM | Last Updated: Dec 09 2017 8:25PM

बुकमार्क करा

कणकवली : शहर वार्ताहर  

कणकवली न.पं.सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी 1 सदस्यीय प्रभाग रचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी नीता-सावंत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी जाहीर केली . 17 जागांसाठी  जाहीर केलेली प्रभाग रचना पुढील प्रमाण

प्रभाग 1ः निम्मेवाडी, मधलीवाडी, करंबेळकरवाडी, सुतारवाडी, पिळणकरवाडी.  जानवली नदीपासून उत्तर-पश्चिम हद्दीपर्यंत. पूर्वेला - नागवे हद्द ते निम्मेवाडी रेल्वेलाइन हद्दीपर्यंत. पश्चिम - जानवली नदी ते रवळनाथ मंदिर मार्गे मच्छीमार्केट रस्ता मार्गे श्री.म्हसकर घर. प्रभाग 2  वरचीवाडी, घाडीवाडी, धनगरवाडी, समर्थनगर. उत्तरेला : जानवली नदीपासून उत्तर पूर्वेस मौजे नागवे हद्दीपर्यंत. पूर्वेला : हरकूळ बु्रदुक सीमेपर्यंत. पश्चिमेला : जानवली नदी ते रेल्वेलाइन मार्ग महारूद्र अपार्टमेंट पर्यंत.प्रभाग 3 बांधकरवाडी, शिवशक्‍तीनगर व लगतचा परिसर.

उत्तरेला - दत्तमंदिर पासून दत्ताराम साटम यांचे घरापर्यंत. पूर्वेला दत्ताराम साटम घर ते लक्ष्मण ठाकूर घरापासून नाल्यापर्यंतचा भाग. पश्चिमेला दत्तमंदिर बांधकरवाडी रस्त्यापासून कलिंगण घर ते मारूती मंदिर ते नवीन नरडवे रस्ता चौक. दक्षिणेला नवीन नरडवे चौक ते बांधकरवाडी तिठा, शिवशक्‍तीनगर मार्गे गडनदीपर्यंत.

प्रभाग 4 परबवाडी, शिवाजीनगर, जळकेवाडीमधील शिवाजीनगर लगतचा परिसर पश्चिम भाग. उत्तरेस गोविंद पाटकर घर ते बिले अपार्टमेंट, पूर्व विष्णू अपार्टमेंट ते सुजित काणेकर घर. पश्चिमेला जळकेवाडी नाला आणि दक्षिणेला भाऊ सावंत घर मार्गे गणपत सावंत घर.प्रभाग 5 विद्यानगर. उत्तर बाळा बांदेकर यांचे जवळील नाला ते श्री.आमणे घरामागील नाला. पूर्व  श्री.आमणे घर ते श्री.उबाळे चाळ पर्यंत नाला. पश्चिम श्री.नेवगी घर ते अलका सावंत घरापर्यंतचा नाला. दक्षिण अलका सावंत घर ते प्रांत ऑफिस. प्रभाग 6

दक्षिण बाजारपेठ.  अप्पासाहेब पटवर्धन चौक ते सुभद्रा घुरसाळे  घरापर्यंत बाजारपेठ रस्ता. पूर्वेला सुभद्रा घुरसाळे घर. पश्चिम अप्पासाहेब पटवर्धन चौक, राष्ट्रीय महामार्ग ते श्री.वायंगणकर खानावळीपर्यंत. दक्षिण राष्ट्रीय महामार्ग ते नगरपंचायत कार्यालय समोरील रस्ता. प्रभाग 7 बाजारपेठ रस्त्याच्या उत्तरेकडील भाग, भालचंद्र नगर. उत्तरेला : राष्ट्रीय महामार्ग ते टकले हॉटेल मार्गे तात्या हर्णे घरापर्यंत. 

पूर्वेला तात्या हर्णे घर ते भवानी मंगल कार्यालय. पश्चिमेला कोहिनूर परमिट रूम, राष्ट्रीय महामार्ग ते बाळकृष्ण मोर्ये यांचे घर. दक्षिणेला भवानी मंगल कार्यालयापासून पटवर्धन चौकापर्यंत. प्रभाग 8  बौद्धवाडी, फौजदारवाडी. उत्तरेला जानवली नदी गणपती साना ते फौजदारवाडी लगत जानवली हद्दीपर्यंत. पूर्वेला जानवली नदी ते उमेश बुचडे घर मार्गे माऊली नगर मधील सुहासिनी चव्हाण घरापर्यंत. पश्चिमेला  जानवली नदी गणपती साणा ते शाळा नं.3 पर्यंत. दक्षिणेला : जि.प.शाळा क्र.3 ते बौद्धवाडी अंतर्गत रस्ता. प्रभाग 9 टेंबवाडी रस्त्याच्या पूर्वेकडील भाग, कांबळी गल्ली, उत्तरेला लिंगायत स्मशानभूमी ते जानवली नदी, गणपती साना हद्द, पूर्वेला जानवली नदी गणपती साना ते भालचंद्र संस्थान हद्द. पश्चिमेला लिंगायत स्मशानभूमी ते श्री.ठाकूर यांच्या घरापर्यंतचा नाला. दक्षिणेला श्री.ठाकूर घर ते टकले हॉटेल पर्यंत.

प्रभाग 10 हायवेच्या पूर्वेकडील टेंबवाडी भाग, गांगोवाडी. उत्तरेला : मौजे कलमठ हद्द , पूर्वेला लिंगायत स्मशानभूमी नाला ते अंधारी गिरण नाला. पश्चिमेला  कलमठ हद्दीपर्यंत, दक्षिणेला मसुरकर संकुल ते वृषाली हॉटेल मार्गे डेगवेकर मिल पर्यंत. प्रभाग 11 सोनगेवाडी, तेलीआळी येथील हायवे लगतचा भाग. उत्तरेला मसुरकर संकुल ते ठाणेकर संकुल मार्गे डी.पी.रोड. पूर्वेला रमेश काळसेकर घर ते उषा कन्स्ट्रक्शन संकुल मार्गे राष्ट्रीय महामार्ग. पश्चिमेला मौजे कलमठ व आशिये हद्दीपर्यंत. दक्षिणेला शिवाजी पुतळा ते एस.टी.डेपो मार्गे आशिये हद्दीपर्यंत.

प्रभाग 12  हर्णे आळी, तेलीआळी उर्वरित भाग. उत्तर : गणेश हर्णे यांचे संकुल मार्गे दत्तात्रय डिचोलकर घर ते चिकन सेंटर पाणंद. पूर्व बाळा बांदेकर नाला ते रामेश्वर प्लाझा संकुल. पश्चिम गणेश हर्णे संकुल ते सांडव संकुल. दक्षिण आबू तायशेटे हॉस्पिटल ते रामेश्वर प्लाझा नाला. प्रभाग 13 नेहरू नगर, बिजलीनगर.उत्तर मनोहर तेंडुलकर घर ते जुवेकर मेडिकल. पूर्व राष्ट्रीय महामार्ग ते मराठा मंडळ   गडनदीपर्यंत. पश्चिम मौजे आशिये हद्दीपर्यंत. दक्षिण  गडनदीपर्यंत. प्रभाग 14  जळकेवाडी उर्वरित दक्षिण भाग. उत्तर पारकर घर ते देवजी राणे मार्गे डॉ.म्हसकर हॉस्पिटल पर्यंत. पूर्व : डॉ.म्हसकर हॉस्पिटल ते नवीन नरडवे रस्ता मार्गे इंदिरा हुन्नरे चाळ . पश्चिम म्हापसेकर घर  मार्गे पारकर घर ते देवजी राणे घर . दक्षिण  सावंत घर ते इंदिरा हुन्नरे चाळ राष्ट्रीय महामार्ग पर्यंत. प्रभाग 15 नाथ पै नगर, शिवाजीनगर रस्त्याच्या दक्षिणेकडील भाग. उत्तर शिवाजीनगर शिवाजी पुतळा, नवीन नरडवे रस्ता मार्गे रगजी घर. पूर्व श्री.बेलवलकर घर ते सावंत सॉ मिलपर्यंत. पश्चिम शिवाजीनगर येथील शिवाजी पुतळा ते शाळा नं.5 मार्गे मालपेकर घर मार्गे दिवाणी न्यायालय पर्यंत. दक्षिण : दिवाणी न्यायालय ते सावंत सॉ मिल पर्यंत राष्ट्रीय महामार्ग.

प्रभाग 16 परबवाडीमधील उर्वरित भाग व शिवाजीनगरमधील दक्षिणेकडील भाग. उत्तर शिवाजीनगर येथील सावंत चाळ ते परबवाडी  राजेंद्र माने संकुल. पूर्व  राजेंद्र माने संकुल ते दळवी घर. पश्चिम  शिवाजीनगर सावंत चाळ ते रगजी घर अंतर्गत रस्ता. दक्षिण रगजी घर ते दळवी यांचे घरापर्यंत नरडवे रस्ता. प्रभाग 17  कनकनगर. उत्तर : शिवशक्ती हॉल ते सरकारे घरापर्यंत नरडवे रस्ता. पूर्व सरकारे घर ते गडनदीपर्यंत. पश्चिम शिवशक्‍ती हॉल ते गडनदीपर्यंत (रेल्वे लाइन). दक्षिण गडनदीपर्यंत.