Sun, Jun 16, 2019 02:12होमपेज › Konkan › मतदार नोंदणीसाठी आता ‘फेसबुक’ची मदत

मतदार नोंदणीसाठी आता ‘फेसबुक’ची मदत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कणकवली : नितीन कदम

‘वाढदिवसांच्या शुभेच्छा’ देण्यासोबत ‘फेसबुक’कडून मतदार नोंदणी करण्याची सूचना तुम्हाला आली तर आश्‍चर्यचकीत होऊ नका.  कारण मतदार नोंदणीचे काम प्रभावी व्हावे, म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने फेसबुकची मदत घेण्याचे ठरविले आहे. भारतात असा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात येणार आहे. ‘फेसबुक’चा वापर करणार्‍यांची संख्या भारतात काही लाखांच्या घरात आहे. एकमेकांशी संपर्क साधणे आणि छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य माहितीची देवाण-घेवाण करण्याचे ते एक प्रभावी साधन आहे. फेसबुकच्या या लोकप्रियतेचा वापर आता नवीन मतदारांची नोंदणी करणे आणि मतदार नोंदणी उपक्रमात जास्तीत जास्त तरूणांना सहभागी करून घेण्यासाठी  केला जाणार आहे. 

मंगळवार 28 रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली असून 31 डिसेंबरपर्यंत ही मोहिम राबविण्यात येणार आहे. 18 वर्षे पूर्ण करणार्‍यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांबरोबरच फेसबुककडून मतदार नोंदणी करण्याबाबतची सूचना पाठविण्यात येणार आहे. ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत त्यांनाही आठवण करून दिली जाणार आहे. नोंदणी करा येथे कळ दाबल्यानंतर मतदारांना थेट छरींळेपरश्र तेींशीी डर्शीींळलशी झेीींरश्र वर जाता येणार आहे. नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने ही खास मोहिम हाती घेतली असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त अचलकुमार ज्योती यांनी जाहीर केले आहेे.