Tue, Jan 22, 2019 20:03होमपेज › Konkan › दिलीप पांढरपट्टे सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी

दिलीप पांढरपट्टे सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी

Published On: Apr 25 2018 10:41PM | Last Updated: Apr 25 2018 10:33PMकणकवली : प्रतिनिधी

सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी म्हणून दिलीप पांढरपट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. सिंधुदुर्गात यापूर्वी त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

सिंधुदुर्गचे यापूर्वीचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची औरंगाबाद येथे बदली झाली आहे.  पांढरपट्टे यांनी यापूर्वी सिंधुदुर्गात काम केलेले असल्याने निश्‍चितपणे त्यांना जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय कारभार अधिक गतिमान पद्धतीने करता येणार आहे. पांढरपट्टे हे कवी आणि गझलकार म्हणून देखील प्रसिद्ध आहेत.