Mon, Mar 25, 2019 09:12होमपेज › Konkan › गोहत्या, वन्यजीव कायद्यामधून शेतकर्‍यांचा छळ!

गोहत्या, वन्यजीव कायद्यामधून शेतकर्‍यांचा छळ!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कणकवली  ; शहर वार्ताहर

शेतीमालाचा भाव ठरविण्यासाठी आणि शेतकर्‍यांना न्याय मिळावा म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत ट्रॅबिनलची व्यवस्था केली. मात्र, ती अद्यापही शेतकर्‍यांसाठी उपलब्ध करून दिली जात नाही. मात्र कायद्यात नसलेल्या वन्यजीव संरक्षण कायदा आणि गोहत्या कायदा शेतकर्‍यांच्या माथी मारुन शेतकर्‍यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे काम भाजप-शिवसेनेचे सरकार करत आहे,अशी टीका महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली.

कणकवली येथे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आणि कष्टकर्‍यांच्या प्रश्‍नासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात रघुनाथदादा पाटील बोलत होते. सत्यशोधक शेतकरी सभेचे संघटक नेते किशोर ढमाले, सुदीप कांबळे, कालिदास आपटे, नाना पाटील, शिवाजीनंद किले, दीपक जगताप, रमेश राणे, शशिकांत राणे, अंकुश कदम, मेरुनाल पवार, श्री.गायकवाड, सायरा बागवान आदी मान्यवर उपस्थित 
होते. रघुनाथदादा पाटील म्हणाले, महाभारतात जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य अशी मोठमोठी बुद्धीजीवी मंडळी माना खाली घालून गप्प बसलेली होती. कारण ती 
दुर्योधनाची दुष्ट प्रवृत्तीचे अन्‍न खात होते.

त्यामुळे त्यांना या घटनेचा विरोध करता आला नाही. आजही तिच अवस्था आहे. म्हणून शेतकर्‍यांचे प्रश्न, त्यांच्यावर अत्याचार होत असताना ते काही बोलू शकत नाहीत. मात्र बुद्धीजीवी लोकांनी एक लक्षात ठेवावे वस्त्रहरणानंतर महाभारतात युद्ध झाले. आता शेतकर्‍यांचेही असेच युद्ध उभे राहील. त्यावेळी या बुद्धीजीवी मंडळींनी कोणाच्या बाजुने रहावे, हे ठरविण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यसारख्या लोकांची अवस्था या लोकांची  होईल. 

कायद्यात तरतूद असताना शेतकर्‍यांच्या मालाला न्याय मिळवून देण्यासाठी ट्रॅबिनलची तरतूद अद्यापही केलेली नाही. जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकर्‍यांना न्याय मिळावा. यासाठी घटनेत तरतूद करून ठेवली आहे. मात्र ज्या तरतुदी नाहीतच आणि समाजाला गरजही नाही, अशा वन्यजीव कायदा अंमलात आणून अंमलबजावणी केली  जाते. ज्या शेतकर्‍यांचे पीक हे वन्यजीव नुकसान करतात. मोकाट कुत्रे दिवसाढवळ्या लहान मुलांना खातात, वाघांकडून शेतकर्‍यांवर हल्ला होतो असे असताना शेतकरी हतबल होऊन काहीही करू शकत नाही. कायदे करून शेतकर्‍यांचेच कंबरडे मोडण्याचा प्रकार सरकारने केलेला आहे आणि एका बाजुने सेंद्रीय शेतीसाठी आग्रह धरणारे हेच सत्ताधारी आहेत अशी टीका रघुनाथदादा पाटील यांनी केली.
 


  •