Sun, Nov 18, 2018 01:47होमपेज › Konkan › लाईफटाईमच्या सहयोगाने पत्रकारांसाठी हेल्थ चेकअप : खा़  नारायण राणे

लाईफटाईमच्या सहयोगाने पत्रकारांसाठी हेल्थ चेकअप : खा़  नारायण राणे

Published On: Jul 21 2018 10:45PM | Last Updated: Jul 21 2018 10:13PMकणकवली : वार्ताहर

कणकवली तालुका पत्रकारसंघ नूतन पदाधिकारी व कार्यकारिणीच्या सदस्यांनी माजी मुख्यमंत्री खा़ नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी शनिवारी भेट घेतली़  या भेटीत मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था, कणकवली तालुक्यातील पत्रकारांच्या हिताच्या दृष्टीने ‘हेल्थ चेकअप कॅम्प’, सदनिकांसाठी शासकीय भूखंड मिळविण्याच्या दृष्टीने खा़ नारायण राणे यांच्याशी चर्चा केली़  या भेटीत कसाल-पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये लाईफटाईमच्या सहयोगाने हेल्थ चेकअप करण्यात येईल, असे आश्‍वासन खा़ नारायण राणे यांनी दिले़

कणकवली तालुका पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकार्‍यांनी खा. नारायण राणे यांची भेट घेतली़  ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, संतोष वायंगणकर, तालुका अध्यक्ष भगवान लोके, सचिव नितीन सावंत, माजी अध्यक्ष संतोष राऊळ यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते़ 

या भेटीत जिल्ह्यातील विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली़ तसेच पत्रकारांच्या हिताच्या दृष्टीने विविध उपक्रमांच्या मदतीसाठी सदैव आपला पुढाकार असेल़  येत्या काही दिवसात कणकवली तालुक्यातील पत्रकारांसाठी ‘हेल्थ चेकअप’ चा कार्यक्रम कसाल-पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलच्या सहयोगाने घेण्याची वेळ लवकरच देण्यात येईल, असे खा़ नारायण राणे यांनी सांगितले़